Sharad Pawar : अजित पवार यांच्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी पवारांकडून ‘या’ नेत्याची घोषणा!

| Updated on: Jul 02, 2023 | 7:11 PM

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केल्यामुळे विरोधी पक्षनेता कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. अशातच राष्ट्रवादीकडूव पवारांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या नेत्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

Sharad Pawar : अजित पवार यांच्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी पवारांकडून या नेत्याची घोषणा!
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपदी काम करत होते. आता अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केल्यामुळे विरोधी पक्षनेता कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. अशातच राष्ट्रवादीकडूव पवारांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या नेत्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच मुख्य प्रतोदपदीही आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आव्हाडांची निवड झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सरकारसोबत जाण्यासाठी मला कुणीही विचारलं नाही. पवारांनी  इतकी पदे देऊनही आमदार सोडून गेले मात्र त्यांच्या मतदारसंघात उद्रेक पाहायला मिळेल. आजारपणात मंत्र्यांनी भाषणं करायचीत आणि आमदारांनी मंत्रालयात बसायचं असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांबाबत संताप व्यक्त केला आहे.

मी मेलो तरी पवारांना सोडणार नाही, राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांच्याकडेच असणार असून पक्ष आणि चिन्ह कोणीही घेऊ शकणार नाही. अवघड परिस्थितीमध्ये संधी म्हणून पाहणार आहे. शरद पवार अजून अॅक्टिव झाले नाहीत थोडं थांबा, असं सूचक वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या घडामोडी सुरु असताना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात फारसा सुसंवाद दिसून येत नव्हता. त्यामुळे आज जयंत पाटील कुठल्या बाजूला असा प्रश्न निर्माण झाला होता? अखेर त्याचं उत्तर मिळालं आहरे. जयंत पाटील यांनी टि्वट केलय. त्यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याच जाहीर केलं.