मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या गॉल ब्लॅडरवर उद्या सर्जरी होणार आहे. त्याबाबत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर आणखी एक सर्जरी करण्यात येणार आहे. (NCP chief Sharad Pawar admitted to breach candy hospital will undergo Gall Bladder surgery)
मागील काही दिवसांपासून शरद पवार यांना प्रकृती विषयक समस्या जाणवत आहेत. त्यांना यापूर्वी अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला होता. याच कारणामुळे त्यांना 30 मार्च रोजी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर 3 एप्रिलला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
गॉल ब्लॅडर का काढणार?
यापूर्वी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर आगामी दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवारांचे गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यासाठीच त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॉल ब्लॅडर काढल्याने त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. पोटदुखीचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला.
शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती. त्या शस्त्रक्रियेमुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल, अशी माहिती त्यावेळी डॉक्टरांनी दिली होती.
इतर बातम्या :
‘पवारसाहेबांच्या’ प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांकडून देव पाण्यात, मुंबईत होमहवन, पुण्यात विठ्ठलपूजा
Sharad Pawar health update : पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?