मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar Symptomatic Gallstones) यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर एण्डोस्कोपी (endoscopy) केली गेली. मिळालेल्या माहितीनुसार पवार यांच्यावरील ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आगामी काळात ते हळूहळू रिकव्हर होतील. तसेच पुढील काही दिवसांत पवार यांच्या गॉल ब्लॅडरवर (gall bladder)सुद्धा शस्त्रक्रिया केली जाणार आहे. (NCP chief Sharad Pawar endoscopy surgery completed condition stable)
आज (30 मार्च) संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. तत्पूर्वी 30 मार्च रोजी दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सध्या शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे तयार झाले होते. हे खडे जर का पित्तनलीकेमध्ये आले आणि नलिकेच्या तोंडाशी अडकले तर परिस्थिती थोडी चिंताजनक होते. पवारांच्या पित्ताशयातील एक खडा नलिकेच्या तोंडाशी अडकून बसला होता. त्याच्यामुळे त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आम्ही उद्या शस्त्रक्रिया केली असती तर त्यांच्या स्वादूपिंडाला आणखी सूज आली असती. त्यांच्या तब्येतीवर आणखी परिणाम झाला असता. त्यांच्या पित्तनलिकेच्या आतमध्ये जाऊन तो खडा काढून. यामुळे पवार यांच्या लिव्हरवरचा दाब कमी होणार आहे. त्यांना झालेला कावीळसुद्धा कमी होईल. तसेच pancreatitis सुद्धा कमी होईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या पित्ताशयात अजूनही काही स्टोन शिल्लक आहेत. त्यावर कधी शस्त्रक्रिया करायची हे नंतर ठरवले जाणार आहे. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निगराणी खाली आहेत.
इतर बातम्या :
“बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवारसाहेबांचाच वडिलकीचा आधार, त्यांना लवकर बरं वाटू दे”
Sharad Pawar: शरद पवार रुग्णालयात, बंगालच्या रणांगणात उतरणार नाहीत, कोणकोणते दौरे रद्द?
Sharad Pawar health update : पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?
(NCP chief Sharad Pawar endoscopy surgery completed condition stable)