मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. (NCP chief Sharad Pawar endoscopy surgery completed condition stable)
मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.
Thanking Dr.Maydeo, Dr. Golwala, Dr.Pradhan, Dr.Daftary, Dr. Samdani, Dr. Tibrewala and Breach Candy Hospital Team pic.twitter.com/SlUD8jh4by
— Supriya Sule (@supriya_sule) March 30, 2021
शरद पवार यांच्या शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे रात्री उशीरा रुग्णालयाबाहेर पडले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांना दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे सांगितले.
Sharad Pawar ji is doing well after the operation. Stone has been removed from the Gallbladder successfully: Maharashtra Health Minister Rajesh Tope (30.03) pic.twitter.com/5p68FrEB7p
— ANI (@ANI) March 30, 2021
After running some tests, we decided to perform the surgery on him (Sharad Pawar) today as there were some complications. We will be deciding on the removal of his Gallbladder later. Currently, he is under observation: Amit Maydeo, Doctor (30.03) pic.twitter.com/Ew0S6AlP3m
— ANI (@ANI) March 30, 2021
शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांनी थोडी कावीळही झाली होती. तीदेखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती. आता शरद पवार यांची प्रकृती कशाप्रकारे सुधारते, यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी द्यायचा हे ठरवले जाईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
“बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवारसाहेबांचाच वडिलकीचा आधार, त्यांना लवकर बरं वाटू दे”
Sharad Pawar: शरद पवार रुग्णालयात, बंगालच्या रणांगणात उतरणार नाहीत, कोणकोणते दौरे रद्द?
Sharad Pawar health update : पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?
(NCP chief Sharad Pawar endoscopy surgery completed condition stable)