Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | शरद पवारांचा तीन शब्दात अजित पवारांना इशारा, म्हणाले… पाहा व्हिडीओ

| Updated on: Jan 19, 2024 | 10:37 PM

भाजपने राज्यातील दोन प्रमुख पक्ष फोडत मोठी फूट पाडली आहे. शिवसेना मूळ पक्ष आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलाच आहे. आता राष्ट्रवादीत दोन गट असून दोन्ही गटातील नेते पक्षावर दावा करत आहेत. अशातच शरद पवारांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | शरद पवारांचा तीन शब्दात अजित पवारांना इशारा, म्हणाले... पाहा व्हिडीओ
sharad pawar and ajit pawar
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अजित पवार यांनी मोठा धक्का देत मोठा गेम केला. आमदारांना सोबत घेत भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले. अजित पवार गटाकडे सर्वाधिक आमदार आहेत. आता शिवसेनेप्रमानेही अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. मात्रशरद पवारांनी अजित पवारांना थेट इशारा दिलाय. शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना 1980 ची आठवण करून देत त्यावेळी जे सोडून गेले होते त्यांचा पराभव झाल्याचं पवार सांगितलं.

सत्ता दिली, मंत्री केलं तरी सोडून गेलेत. मात्र 1980मध्येही जे सोडून गेले. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला असं सूचक वक्तव्य पवारांनी केलंय. बारामतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना, शरद पवारांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली.

पाहा स्पेशल रिपोर्ट

सत्तेत संधी दिलेली असताना, काही जण सोडून गेले. पण काही जण सत्तेसाठी तर काही जण भीतीमुळं भाजपसोबत गेल्याचं शरद पवार म्हणालेत. 1980 मध्ये इंग्लंडला गेलो त्यावेळी 70 आमदार होते..पण परत आल्यावर 62 आमदार सोडून गेले होते..मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत 58 आमदारांना घरी बसवलं. हीच स्थिती येत्या निवडणुकीतही दिसेल असा इशारा पवारांनी दिला.

कार्यकर्त्यांशी चर्चा करताना, शरद पवारांनी आपल्या मनातली भावनाही बोलून दाखवली. कर्तृत्व असतानाही मुलगी सुप्रियाला मंत्री केलं नाही…तिला बाजूला ठेवलं,असं पवार म्हणालेत. एकीकडे शरद पवारांनी बारामतीतून अजित पवार गटाला इशारा दिला…तर दुसरीकडे शरद पवार गटानं ट्विट्वर अजित पवारांच्या जुन्या प्रतिक्रियांचा व्हिडीओ ट्विट करत धोकेबाज म्हटलंय.

महाविकास आघाडीत असताना, अजित पवार भाजप आणि शिंदेंवरही तुटून पडत होते. त्याच जुन्या भाषणांचा आधार घेत, आता शरद पवार गटानं डिवचणं सुरु केलंय.