NCP Crisis | पक्ष उभा करायला राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष, हिंमत लागते! अजित पवार यांना मनसेने डिवचले

| Updated on: Feb 07, 2024 | 9:15 AM

NCP Crisis | केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला. आयोगाच्या या अनपेक्षित निकालाने राजकीय विश्लेषकांना पण धक्का बसला आहे. अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असण्यावर शिक्कामोर्तब झाले. याप्रकरणी आता मनसेने केलेले ट्विट चर्चेत आले आहे.

NCP Crisis | पक्ष उभा करायला राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष, हिंमत लागते! अजित पवार यांना मनसेने डिवचले
Follow us on

मुंबई | 7 February 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची यावर निकाल दिला. हा निकाल शरद पवार गटाला मोठा धक्का देणारा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार गटाची असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले. शरद पवार गटाला राजकीय धक्का देण्यात अजित पवार गटाला यश आले. शिवसेना प्रकरणात आलेल्या निकालाचीच ही पुनरावृत्ती असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पक्ष संस्थापकालाच राष्ट्रवादीतून बाहेर पाडण्याच्या या निकालावर मनसेने तोंडसूख घेतले आहे. मनसेने या सर्व प्रकरणात ट्विट केले. सध्या समाज माध्यमांवर हे ट्विट चर्चेत आले आहे.

व्हिडिओ केला शेअर

हे सुद्धा वाचा

मनसेच्या अधिकृत पेजवरुन राज ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. रत्नागिरीतील सभेत राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला केला होता. तोच व्हिडिओ या घडामोडीनंतर शेअर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मनसेने अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय केले ट्विट

‘ बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसाकवणं सोप्प आहे. पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते..असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!’ असे ट्विट करत मनसेने अजित पवार यांच्यावर थेट हल्ला केला. मनसेने त्यांच्यावर पक्ष, चिन्ह चोरल्याचा आरोप केला आहे. तसेच राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा केल्याचा दाखला देत डिवचले आहे.

आज दुपारपर्यंत संधी

निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे सूचविण्याचा पर्याय दिला आहे. 7 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. राज्यसभा निवडणूक आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी त्याचा वापर होईल. आज दुपारपर्यंतची वेळ त्यासाठी देण्यात आली आहे.