मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन नंबरवर असलेली राष्ट्रवादी निधी मिळवण्यात अव्वल ठरली आहे. तर सर्वाधिक संख्याबळ आणि मुख्यमंत्रीपद स्वत:कडे असूनही शिवसेना निधी मिळण्यात सर्वात मागे असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये नंबर दोन असलेली राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळवण्यात मात्र अव्वल ठरली आहे. ज्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे ती शिवसेना निधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेसच्याही पिछाडीवर असल्याच आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. विकासनिधी मिळवण्यात शिवसेनेचे युवाप्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागालाही फटका बसला आहे. एका आकडेवारीनुसार शिवसेनेच्या 56 आमदारांना एकूण 55, 255 कोटी निधी विकासकामांसाठी मिळाला आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे एकूण 43 आमदार आहेत. काँग्रेसचं सत्तेतील स्थान तिसरं आहे. पण निधी मिळवण्यात काँग्रेसने दुसरा क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसला एकूण एक लाख 24 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मागे निधी मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. त्यावरून नाराजीही व्यक्त केली होती. हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेला होता. त्यानंतर काँग्रेसला चांगलाच निधी मिळाल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे.
या निधी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात पुढे आहे. राष्ट्रवादीचे एकूण 53 आमदार आहेत. राष्ट्रवादी सत्तेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. पण निधी मिळवण्यात राष्ट्रवादीने बाजी मिळवली आहे. राष्ट्रवादीला 2 लाख 24 हजार 411 कोटींचा निधी मिळवला आहे. 2020-2021मधील हे आकडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थमंत्रीपद आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सर्वाधिक निधी मिळालाय का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.
शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असताना सर्वाधिक जास्त आमदार संख्या असतानाही त्यांच्या वाट्याला आलेला निधी सर्वात कमी असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादीच्या विभागांना शिवसेनेपेक्षा चौपट निधी मिळाला आहे. तर शिवसेनेच्या दुप्पट निधी मिळवून घेण्यास काँग्रेस यशस्वी झाली आहे.
Video : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 PM | 16 December 2021 https://t.co/eJMp6b6zD7 @OfficeofUT @AjitPawarSpeaks #Headlines #MahaFastNews #fastnews #SuperFastnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2021
संबंधित बातम्या:
एकाचवेळी निवडणूक घ्या, निवडणूक आयोगाला विचार करावाच लागेल: बाळासाहेब थोरात
Maharashtra News Live Updates : टीईटी परीक्षा गैरप्रकार प्रकरणी तुकाराम सुपे सोबत अभिषेक सावरीकर अटक