राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बाबा सिद्दीकी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून ते लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत. फूड पॉइजनिंग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बाबा सिद्दिकी यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची ‘जनसन्मान यात्रा’ सध्या सुरू आहे. ही ‘जनसन्मान यात्रा’ 20 ऑगस्टला मुंबईत होती. यावेळी बाबा सिद्दिकी हे त्या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लीलीवती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ‘जनसन्मान यात्रे’त बाबा सिद्दीकी सहभागी झाले होते. यावेळी त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी देखील या यात्रेत सहभागी झाले होते. महिलावर्ग मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी झाला होता. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची तब्येत खालावली. विषबाधा झाल्याने बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बाबा सिद्दीकी हे मुंबईतील राजकीय वर्तुळातील मोठं नाव आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. 1999 साली ते पहिल्यांदा वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 2014 पर्यंत ते सलग या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. आघाडी सरकारमध्ये ते मंत्री देखील राहिले आहेत.
नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या काळात कामगार, अन्न नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन खात्याचं राज्यमंत्रिपद त्यांनी सांभाळलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघ सोडून वांद्रे पूर्व मतदारसंघासाठी तयारी केली. पण ऐन निवडणुकीवेळी त्यांनी स्वत: या मतदारसंघातून न लढता त्यांचे पुत्र झिशान यांना मैदानात उतरवलं. झिशान सिद्दीकी यांनी ही निवडणूक जिंकली होती.