बाबा सिद्दीकींच्या हत्येशी संबंधित असलेला अनुज थापन नेमका कोण? बिश्नोई गँगकडूनही उल्लेख

| Updated on: Oct 13, 2024 | 5:19 PM

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

बाबा सिद्दीकींच्या हत्येशी संबंधित असलेला अनुज थापन नेमका कोण? बिश्नोई गँगकडूनही उल्लेख
Follow us on

Who is Anuj Thapan : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

बिश्नोई गँगमधील एका सदस्याने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्यांचे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध, असे बिश्नोई गँगने म्हटले आहे. यानंतर बिश्नोई गँगने उल्लेख केलेले अनुज थापन नक्की कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनुज थापन कोण?

अनुज थापनला हा बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार केल्यानंतर प्रसिद्धीझोतात आला होता. तो बिश्नोई गँगमध्ये सक्रीय होता. लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरुन अनुजने सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार केला होता. अनुजने सागर पाल आणि विक्की गुप्ताला पिस्तूल आणि 40 काडतूसं दिली होती. त्यानंतर सागर आणि विक्की 14 एप्रिलला मुंबईत पोहोचले. पहाटेच्या सुमारास या दोघांनी सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पाच राऊंड फायर केले.

त्यांना पूर्ण चाळीस राऊंड फायर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या गोळीबार केल्यानंतर सागर आणि विक्की गुजरातला पळाले. मुंबई पोलिसांनी गुजरातमधल्या भूजमधून या दोघांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अनुज थापनने मुंबई क्राईम ब्रँचच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. अनुज थापन हा मूळचा पंजाबचा होता. त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी वसूल करणे या गंभीर गुन्ह्यातंर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. बिश्नोई टोळीने अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सलमान खानच्या जवळचे असलेले बाबा सिद्दिकी यांची हत्या केली आहे.

मरिन लाईन्समधील बडा कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार

त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाईल. रात्री 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी होईल. बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती समोर आली आहे.