Corona | कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण, प्रकृतीबाबत माहिती समोर

| Updated on: Dec 24, 2023 | 6:12 PM

Dhananjay Munde Corona Positive : कोरोनाचा धोका वाढत चालल्याचं दिसत असून नवीन व्हेरियंट आणखी घातक असल्याची माहिती समजत आहे. कोरोना आता परत एकदा हातपाय पसरवायला लागल्याचं दिसत आहे. अशातच मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Corona | कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण, प्रकृतीबाबत माहिती समोर
dhananjay munde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरियंट पसरत चालला असल्याने धोका वाढत चालला असल्याचं दिसत आहे. अशातच राज्यातील महायुती सरकारमधील कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना कोरानाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतल्यावर ते पॉझिटिव्ह आल्याचं समजलं. याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट (एक्स) करत माहिती दिली आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली. त्यानंतर पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलं आहे. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. धनंजय मुंडे पुण्यामधील मॉडर्न कॉलनीमधील घरात क्वारनटाईन झाले असल्याची माहिती समजत आहे. 

कोरोनाचा नवा व्हेरियंट घातक

कोरोनाचा हा नवा सब-व्हेरियंट JN.1 असून आतापर्यंत कोरोनाच्या रूग्णांमध्ये सर्वात सामान्य लक्षणांमध्ये ताप, सर्दी, घसा खवखवणे, डोकेदुखी आणि सौम्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे यांचा समावेश आहे. लग्न हॉल, ट्रेन आणि बस यासारख्या गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे फायद्याचं ठरेल. कारण यामुळे कोविडसह अनेक वायुजन्य रोगांपासून संरक्षण होईल.