अजितदादा फक्त ‘या’ व्यक्तीचं ऐकतात, ते सांगतील तसंच वागतात; जयंत पाटील यांनी फोडलं गुपित; ती व्यक्ती कोण?

| Updated on: Sep 10, 2024 | 12:33 PM

Jayant Patil on Ajit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुपित फोडलं. अजितदादा फक्त 'या' व्यक्तीचं ऐकतात, ते सांगतील तसंच वागतात, असं जयंत पाटील म्हणालेत. त्यांनी अजित पवारांच्या बदललेल्या शैलीवरही भाष्य केलंय. वाचा सविस्तर...

अजितदादा फक्त या व्यक्तीचं ऐकतात, ते सांगतील तसंच वागतात; जयंत पाटील यांनी फोडलं गुपित; ती व्यक्ती कोण?
जयंत पाटील, अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. गडचिरोलीत बोलताना अजित पवार यांनी कुटुंबात फूट पडणं योग्य नसल्याचं म्हटलं होतं. घरात फूट पडली तर लोकांना ते आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. ती माझी चूक मी मान्य केली आहे, असं अजित पवार म्हणाले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अजितदादा फक्त एका व्यक्तीचं ऐकतात, ते सांगतील तसंच वागतात, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील काय म्हणाले?

शरद पवारसाहेबांना सोडून चूक झाल्याचं अजितदादांनी स्वतःहून सांगितलं आहे. सध्याचे अजितदादा अरोरा नावाचे कन्सल्टंट सांगतील तसं बोलतात. अरोरा या कन्सल्टंट कंपनीने अजितदादांना त्यांचा मूळ स्वभाव दाखवण्यास पूर्ण बंदी केली आहे. अजित पवार पहिल्यासारखे बोलत नाहीत. अरोरा नावाचा कन्स्लटन्ट सांगतो तसे अजित पवार बोलतात. सल्लागार सांगतात तसे बोलतात. सहानुभूती, मागच्या झालेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची इच्छा दाखवण्याचा प्रयत्न करणं, हे अरोराने दादांमध्ये केलेलं परिवर्तन आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

अजितदादांकडून मुख्यमंत्रिपदाची मागणी?

काल मुंबई विमानतळावर महायुतीची बैठक झाली. यात अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव दिल्याची बातमी ‘द हिंदू’ दिली आहे. यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील. त्यांची मागणी करावी अशी पोजिशन आहे, असं ही मला वाटत नाही. निवडणुकीपूर्वी अशी मागणी ते करतील असे मला वाटत नाही. कुणीतरी ही खोटी बातमी पसरवली असेल. भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे तिथे. अनेकांना तिथे मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

भाग्यश्री आत्राम या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत जयंत पाटील यांनी विचारण्यात आलं. तेव्हा शिवस्वराज यात्रा भंडारा, गोंदियात आज असेल. उद्याची नागपूर यात्रा रद्द केली आहे. परवा गडचिरोली अहेरीत यात्रा असेल. अहेरीत गेल्यावर कळेल कोणाला आमच्या पक्षात यायचं आहे आणि कुणाला नाही, असं जयंत पाटील म्हणालेत.