राष्ट्रवादीचे नेते, कळवा- मुंब्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप ट्विट केलं आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा प्रत्यक्षदर्शीची ऑडिओ क्लीप असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
कथित प्रत्यक्षदर्शी : अस-सलाम-अलैकुम
दुसरी व्यक्ती : वा-अलैकुम-सलाम
कथित प्रत्यक्षदर्शी : भाई मी तुम्हाला एक व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. पण नंतर मी घाबरलो आणि ते डिलीट केलं.
दुसरी व्यक्ती : का?
कथित प्रत्यक्षदर्शी : ते काय झालं ना… अक्षय शिंदेचा जो मर्डर झाला. त्याच्या मागे माझीच गाडी होती. मी काही करू शकलो नाही. म्हटलं तुम्हाला सांगावं. पण मग विचार केला की काही चुकीचा मेसेज नको जायला. माझ्या मागे गोष्टी लागायला नको.
दुसरी व्यक्ती : व्हीडिओ होता का तुमच्याकडे?
कथित प्रत्यक्षदर्शी : नाही व्हीडिओ नाहीये. पण मी आणि मेव्हणा एका रॅलीला जात होतो. मुंब्रा बायपासवरून जात होतो. तेव्हा एक व्हॅन पाठीमागून आली. त्या व्हॅनला पडदे लावले होते. गाडीतून ठक करून आवाज आला. आम्हाला वाटलं की गाडीचा पाटा वाजला असेल. मग पुन्हा आवाज आला. मग मी घाबरलो. म्हटलं काही तरी इश्यू असेल. तेव्हा पोलिसांनी गाडी थांबवली. दोन पोलीसवाले बाहेर आले. मग पुन्हा त्यांनी व्हॅन बंद केली. मग तिसरा आवाज आला. तेव्हा आम्ही घाबरलो. त्यांना ओव्हरटॅक केलं आणि निघून गेलो. ते कळव्याकडे गेले आणि आम्ही जंक्शनकडे गेलो. आता मी तुमच्याशी बोलतोय. पुढे काही अडचणी नको यायला.
दुसरी व्यक्ती : नाही काही अडचण नाही येणार… का अडचण येणार?
कथित प्रत्यक्षदर्शी : मला वाटलं की गाडीचा पाटा वाजला असेल. पण तिसऱ्यांदा आवाज आला. गाडीला पण पडदे लावले होते. माझा मेव्हणा पण घाबरला. म्हणाला चला इथून… आणि आम्ही तिथून निघून गेलो.
अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका…
निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. pic.twitter.com/tfnkQ6HmkU— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2024
अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर रोजी एन्काऊंटर करण्यात आला. पण हा एन्काऊंटर कुठे करण्यात आला? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. त्यात हा एन्काऊंटर होत असताना तिथे उपस्थित असणारा प्रत्यक्षदर्शी आणि एका पत्रकाराचा ऑडिओ क्लिप शेअर केला आहे. त्यात अक्षय शिंदेचा एनकाऊंटर हा मुंब्रा बायपास रोडवरील हजरत सय्यद फकीर शहा बाबा दरगाहच्या पुढे काही अंतरावर झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने त्या ऑडिओ क्लिपमध्ये दिली आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही 9 मराठी करत नाही.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांच्या या आरोपांना उत्तर दिलं आहे. अफवा पसरवण्यात हातकंडा असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कथित ऑडिओ क्लिप पसरवली जात आहे.पोलिसांची व सरकारची प्रतिमा मालिन करण्यासाठी आव्हाड साहेबाकडून ही क्लिप स्क्रिप्टेड बनवलेली वाटत आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ याची चौकशी करावी, असं सूरज चव्हाण म्हणालेत.
अफवा पसरवण्यात हातकंडा असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कथित ऑडिओ क्लिप पसरवली जात आहे.पोलिसांची व सरकारची प्रतिमा मालिन करण्यासाठी आव्हाड साहेबाकडून ही क्लिप स्क्रिप्टेड बनवलेली वाटत आहे.@ThaneCityPolice या प्रकरणाची तात्काळ याची चौकशी करावी. https://t.co/PYSvoHP8VF
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) September 29, 2024