Sharad Pawar : अल्पसंख्याकांनी धुळीस मिळवले मोदींचे 400 पारचे स्वप्न; आता सत्ताधाऱ्यांच्या हातातून सत्ता खेचण्यासाठी शरद पवार यांनी काय दिला मंत्र

| Updated on: Aug 29, 2024 | 12:17 PM

Sharad Pawar on Muslim Reservation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 400 पार हा एकच उद्देश होता. त्यांना सर्व अधिकार एकहाती घ्यायचे होते. पण देशातील अल्पसंख्याकांनी त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवले. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी हा खास मंत्र दिला आहे.

Sharad Pawar : अल्पसंख्याकांनी धुळीस मिळवले मोदींचे 400 पारचे स्वप्न; आता सत्ताधाऱ्यांच्या हातातून सत्ता खेचण्यासाठी शरद पवार यांनी काय दिला मंत्र
सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी दिला शरद पवारांनी हा मंत्र
Follow us on

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील अल्पसंख्याकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 400 पारपासून दूर ठेवले. एक हाती सत्ता हाच 400 पारचा एकच उद्देश होता. पण देशातील अल्पसंख्याकांनी असे होऊ दिले नाही. पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने राष्ट्रीय कार्यकारणी बैठक आणि कार्यकर्ता संमेलन मुंबईत झाले. या कार्यक्रमात त्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली. विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खेचण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना एक मंत्र दिला.

काय दिला मंत्र

हे सुद्धा वाचा

वक्फ बोर्डानुसार, अल्पसंख्यांकांना जे अधिकार देण्यात आले आहेत, ते संपवण्याचे षडयंत्र करण्यात येत आहे. वक्फ मालमत्तेचे काय करायचे, त्याचा कोणत्या कामासाठी वापर करायचा, हा अधिकार अल्पसंख्याकांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातून सत्ता खेचण्यासाठी 2 जागा कमी मिळाल्या तरी हरकत नाही, पण आम्ही जादा जागा मागणार नाहीत. गेल्या 10 वर्षांपासून देशाची सत्ता चुकीच्या हातात आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांचा विश्वास संपादन करणे हे सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


हा देश आपल्या सर्वांचाच

हा देश सर्वांचाच आहे. ज्यांच्यावर असे वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकसभा निवडणुकीत देशातील पंतप्रधान 400 पारचा नारा देत होते. कशाला हव्या होत्या त्यांना इतक्या जागा? 400 पारचा नारा हा देशाच्या हितासाठी नव्हता. तर एका व्यक्तीच्या हातात अधिकार यावेत यासाठी होता. याविषयीची भीती वेळीच ओळखल्यानंतर 400 पार नाऱ्याचे स्वप्न भंगले. देशातील जनता सामाजिक ऐक्य बंधुता हवी आहे. शांतता हवी आहे. 400 पारचा आकडा ओलांडल्यानंतर यात अडथळा निर्माण होऊ शकला असता.

सरकारला भ्रष्टाचाराची लागण

नवीन संसदेच्या इमारतीच्या उद्धघाटनावेळी अशा लोकांन बोलवण्यात आले, ज्याचे या प्रक्रियेशी काहीही देणे घेणे नव्हते. त्यावेळी संसदेच्या सदस्यांना बोलवण्यात आले नाही. नवीन संसद, आयोध्येतील राम मंदिराला गळती लागली आहे. सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. या सर्व गोष्टीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. रामगिरी महाराजांना कोणी महाराज केले माहिती नाही, पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.