युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शरद पवार गटाचे कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पिपाणी या चिन्हामुळे शरद पवार गटाचं नुकसान झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. यावर बोलताना सूरज चव्हाण यांना टोला लगावला आहे. पिपाणीमुळे तुतारीला कमी मत मिळाली असं म्हणणं चुकीचं आहे. पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस यात फरक आहे. काहीतरी मागणी करायची म्हणून केलेली आहे. हा देश संविधानानं चालत असतो. संविधानाच्या आधारावर आम्हाला घड्याळ चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोग आणि सुप्रिम कोर्टात विजय आमचा असेल, असं सूरज चव्हाण म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना सूरज चव्हाण यांनी हे विधान केलं आहे.
अजित पवार गटात अस्वस्थता असल्याचं रोहित पवार म्हणाले. यावर राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराच्या मनात चलबिचल नाही. उलट शरद पवार गटातीलच आमदार अजितदादांकडे येतील. रिटायर्ड झालेले लोक शरद पवारांकडे जाताहेत. तरूणांचा ओढा मात्र अजित पवारांकडे आहे. महायुतीसोबत निवडणुका अजित पवार गट लढणार आहे. ज्यांना वाटतं अजित पवार गटा दुस-यासोबत निवडणुका लढेल. तर हे मुंगेरीलाल के हसीन सपने हे बघ आहेत असं मला वाटतं, असं सूरज चव्हाण म्हणाले.
शरद पवार गटात आता काही लोक पक्षप्रवेश करत आहेत. पण आमच्याकडे येण्यासुद्धा अनेक इच्छुक आहेत. जे येत्या काळात पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या काळात अनेकांचा पक्षात प्रवेश होणार आहे. आमचा कोणताही आमदार हा चलबिचल नाही आहे. सर्व आमदार हे अजित दादांवर विश्वास ठेवून पक्षात राहणार आहेत, असंही सूरज चव्हाण म्हणाले.
अजित पवारांनी पुण्यात बेकायदेशीर कामाविरोधात कारवाई केलीय. पालकमंत्री म्हूणून अजित पवार काम करत आहेत. जागावाटपाच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. 80 पेक्षा अधिक जागा लढाव्या अशी आमची भूमिका आहे, असंही सूरज चव्हाणांनी सांगितलं.