‘जनतेच्या न्यायालयात न्याय बाकी…’; शिंदेंच्या बाजूने निकाल लागल्यावर राष्ट्रवादीच्या खासदाराचं ट्विट व्हायरल

| Updated on: Jan 10, 2024 | 8:46 PM

MLA Disqualification Result : आमदार अपात्रतेवर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटातील आमदारांना अपात्र ठेवलं आहे. मात्र शिवसेना शिंदेंची असल्याचं सांंगितलं आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीच्या खासदाराचं ट्विट व्हायरल होत आहे.

जनतेच्या न्यायालयात न्याय बाकी...; शिंदेंच्या बाजूने निकाल लागल्यावर राष्ट्रवादीच्या खासदाराचं ट्विट व्हायरल
Amol kolhe talk on MLA Disqualification Result
Image Credit source: NNP MLA Amol Kolhe Twitter
Follow us on

मुंबई : आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देताना  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही. मात्र उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली आहे. उद्धव ठाकरे यांचेही आमदार पात्र करण्यात आले असले तरी आता शिवसेना त्यांच्याकडे राहिली नाही. अशातच या निकालावर राष्ट्रवादीमधील शरद पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

परिस्थिती जेवढी बिकट, लढवय्या तेवढाच तिखट, हा कोणाचा जय किंवा पराजय नाही. हे केवळ सत्ताधाऱ्यांच्या निर्ढावलेपणावर, दूषित राजकारणावर विधानसभा अध्यक्षांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. लढाई अजून बाकी आहे, जनतेच्या न्यायालयात न्याय अजून बाकी असल्याचं  अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

 

नेमका काय दिला निकाल?

दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळण्यात आल्या. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र केला नाही. तर शिवसेना मूळ राजकीय पक्ष हा शिंदेचा असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला आहे. आता शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंचा झाला असून दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्षांनी स्वत: दोन पक्ष बदलले आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षांतरबंदी कायदा करण्यापेक्षा आपल्या भावी वाटचालीमधील अडथळा दूर केला आहे. नार्वेकर यांनी निकाल देण्याआधी सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होतेधाब्यावर बसवले आहेत. पायदडी तुडवले असून जणू ते त्यांच्या मागे काही मोठी शक्ती आहे. ही मॅचफिक्सिंग होती. सर्वोच्च न्यायालयाला जुमानात नसल्याचं निकालामध्ये स्पष्ट दिसून आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राऊत प्रचंड संतापले

कोण शिंदे, कोण नार्वेकर? काय त्यांची औकात काय आहे? मराठी माणसासाठी आणि लोकशाहीमधील ही काळा दिवस आहे. इतिहास माफ करणार नाही हे शिंदेंना जावून सांग. कितीही खोके आणले तरी शिवसेना संपणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.