मुंबईः शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल (Rebel MLA) आता राज्याभरातील शिवसैनिक तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्या प्रमाणे शिवसैनिक (Shisainik) तीव्र संताप व्यक्त करत आहेत, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत घटक पक्ष असणाऱ्या नेत्यांकडूनही बंडखोर आमदारांबद्दल तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आज दुपारी बंडखोर आमदार आणि शिवसेनेकडून असलेली अपेक्षा व्यक्त करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांना आमदार अमोल मिटकरी यांनी दीपक केसरकरांनी इकडे येण्याची घाई करू नये, गुवाहाटीत 7 ते 8 महिन्याचा पाहुणचार घ्यावा असा सल्ला आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी दिला आहे.
बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात कोकणातील आमदार दीपक केसरकर सहभागी झाल्यानंतर त्यांनी आज बंडखोर आमदारांच्या गटाकडून आज पत्रकार परिषद घेतली.
त्या परिषदेवेळी त्यांनी बंडखोर आमदारांची भावना आणि मुख्यमंत्र्यांकडून नाराज आमदारांच्या असलेल्या अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. आमदार दीपक केसरकर यांच्या या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीतील घटकपक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दीपक केसरकर यांना गुवाहाटीतच सात आठ महिने राहण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.
बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना अमोल मिटकर यांनी सल्ला देताना सांगितले की, मी सरकारला विनंती करतो की, बारा आमदारांचा निर्णय घ्यायला राज्यपालांनी 7 ते 8 महिन्यांचा कालावधी लावला आहे. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांनीही महाराष्ट्रात येण्याची घाई करू नये, 7 ते 8 महिन्याचा पाहुणचार भाजप सरकारचा घ्यावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
बंडखोर आमदारांविषयी बोलताना अमोल मिटकरी यांनी दीपक केसरकरांना सल्ला देताना सांगितले तुम्ही महाराष्ट्रायत येण्याची कोणतीही घाई करू नका, कारण आता जी राज्यातील परिस्थिती आहे, त्यामुळे 2024 पर्यंत राज्यातील हा माहोल असाच राहणार आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील राजकीय परिस्थिती बदलणार नसून, ती अशीच राहणार असल्याने बंडखोर आमदार अमोल मिटकरी यांनी दीपक केसरकर यांनी सल्ला दिला आहे की, येणारी दोन वर्षं आपण गुवाहाटी येतेच राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.मतदार संघात आपल्याला जनता फिरू देणार नाही असा टोलाही यावेळी दीपक केसरकर यांना अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.