मुंबई : 2019 ला निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार ईडीच्या कार्यालयावर आले होते. एका नोटीशीनं राजकारण तापलं होतं. नेमकी आता तीच परिस्थिती 2024 मध्ये होताना दिसतेय. मात्र नोटीस रोहित पवारांना आहे., आणि त्यावेळचे अजित पवार आज सत्तेत आहेत. पाहूयात हा रिपोर्ट.
2019 च्या निवडणुकांआधीचा योगायोग २०२४ ला सुद्धा घडतोय की काय अशी चर्चा सुरुय. ४ वर्षात परिस्थिती बदललीय, समीकरणं बदललीयत. मात्र ईडीची नोटीस, त्यावरुन शरद पवार गटानं केलेलं शक्तिप्रदर्शन आणि सरकारकडून दिली जाणारी उत्तरं ही सारखीच आहेत.
2019 ला शरद पवारांना ईडीची नोटीस गेल्याची चर्चा झाली. स्वतः शरद पवार चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले., याच दरम्यान नॉट रिचेबल झालेले अजित पवार माध्यमांसमोर आले. ईडीद्वारे सूडाच्या राजकारणाच्या आरोप करत अजित पवार भावूक झाले होते. यंदा नोटीस रोहित पवारांना आलीय मात्र अजित पवार सत्ताधारी बाकांवर आहेत आणि ईडीच्या नोटीसीबद्दल त्यांचीही भूमिका बदलल्याचं दिसतंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडी तब्बल बारा तास ईडी चौकशी चालली होती. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर कधी झुकत नाही आणि झुकणारही नाही. आपल्या विचाराचा आमदार अडचणीत येतो आणि त्याच्यावर अन्याय होतोय हे सर्वांचे लाडके नेते शरद पवार यांना समजल्यावर ते इथं येऊन बसले होते. शरद पवार बापमाणूस भक्कमपणे पाठिमागे असल्याचं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांना पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे. 1 फेब्रुवारीला रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.