मुंबई : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समजत आहे. रोहित पवार यांच्या प्रोफाईल फोटोलो सिया राजपूत हे नाव दाखवत आहे. रोहित पवार सोशळ मीडियावर चांगले अॅक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात. रोहित पवार यांच्या फेसबुकला सिया राजपूत असं नाव दाखवत आहे. रोहित पवार यांच्या समर्थकांनी अकाऊंट हॅक झाल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदार संघातून निवडणूक लढवत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यावर रोहित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. आताच
गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं… या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं.
याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत.#facebookhack— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 22, 2023
गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं आहे. या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं, असं रोहित पवार यांनी ट्विट केलं होतं.
रोहित पवार यांनी आता गेल्या काही दिवसांपूर्वी संघर्ष यात्रा काढली होती. संघर्ष यात्रेचा समारोप झाल्यावर नागपूरमधील विधान भवनाकडे सगळे निघाले होते. मात्र पोलिसांनी वाटेत त्यांना अडवलं होतं. त्यावेळी पोलीस आणि यात्रेत सहभागी झालेल्या युककांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता.