मुंबई : विरोध गटातील नेत्यांवर लक्ष ठेवायचे आणि काही काळ गेल्यानंतर त्यांना त्रास देत त्यांची ताकद कमकुवत करायची असा अजेंडा भाजपचा चालू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. शशिकांत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधताना भाजपच्यी कुटील राजकारणावरून त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या राजकीय खेळीवर बोलताना आणि फोडाफोडीच्या राजकारणावरून त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
माझ्या भावाला राजकीय आमिष दाखवून त्याला फोडायचे काम भाजपने केले आहे. याच प्रकारचे राजकारण भाजप करत आहे,
त्यातूनच त्यांनी विरोधकांची ताकद खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहेत असा घणाघातही त्यांनी भाजपवर केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून बंडखोर आमदारांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवली गेली आहेत. ज्या प्रकारे त्यांना मंत्रिपदाची आणि इतर आमिष दाखवले होते,
त्याच प्रकारे त्यांना खोक्यांचेही आमिष दाखवले होते, त्यामुळेच त्यांनी बंड केले होते असा गंभीर आरोपही शशिकांत शिंदे यांनी त्यांच्यावर केला आहे. त
ज्या आमदारांनी बंड केले होते, त्यांना आजच्या सरकारने आमिष दाखवल्यामुळेच महाविकास आघाडी सोडून ते पदासाठी शिवसेना भाजपबरोबर गेले आहेत असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
गेल्या काही दिवासंपासून भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. त्याचबरोबर जिल्हा पातळीवरच्या नेत्याला भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. त्यांना त्रास दिला आहे.
त्यामुळे जिल्हा पातळीवरच्या नेत्याची आणि पक्षाची ताकद खिळीखिळी करायचे हेच काम भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून केले जात आहे. त्यामुळे हाच भाजपचा अजेंडा चालू आहे, आणि त्यामुळेच काही लोकप्रतिनिधी भाजपमध्ये गेल्याचेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
शशिकांत शिंदे यांनी भाजपला आव्हान देत म्हटले आहे की, आता मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती फोडायची नाही तर युती संपवण्याचा विचार मी करत आहे असा थेट इशाराच त्यानी भाजपला दिला आहे. जर भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात असेल तर आम्हीही आता जय्यत तयारी केली आहे.
तर आता शिवसेना-भाजपची युती फोडायची नाही तर ती युती संपवण्याचा विचार मी करतो आहे आणि त्या विचारावर आपण ठाम असल्याचे स्पष्टीकरण शशिकांत शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे भविष्यात आता भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वाकयुद्ध रंगणार असल्याचे चिन्हं दिसून येत आहे.