मुंबईः शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन यांच्या पठाण चित्रपटावरून आता वाद भडकला आहे. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी पठाण चित्रपटातील दीपिका पदुकोनच्या बिकिनीवरून वाद उखरून काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आता भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मध्य प्रदेशाच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधत भाजपकडून विकासाच्या गोष्टी बाजूला ठेऊन, रोजगार, शिक्षण, स्वच्छता असे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेऊन धर्मावरून राजकारण भडकावण्याचं काम भाजपकडून केले जात असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
राज्यात आणि केंद्रात सत्ते असलेल्या भाजपला आता तुमचा पक्ष विकासासाठी आहे की अशा चित्रपट, मनोरंजनाच्या गोष्टीवरून वाद भडकावण्यासाठी तुम्ही काम करत आहात असा सवाल त्यांनी केली आहे.
चित्रपटाकडे मनोरंजन म्हणून न पाहता त्यातून वाद निर्माण करण्याचा, माथी भडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भाजप पक्षाकडून नेहमी रंगाचे राजकारण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे धर्मा धर्मावरून लोकांची माथी भडकावणं, महिलांमध्ये वाद निर्माण करणे हे असले प्रकार भाजपने थांबवावे असा टोलाही त्यांना लगावण्यात आला आहे.
भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या धर्माचा अभिमान आहे. त्यामुळे आपलाच धर्माची इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका असा सल्लाही त्यांनी मध्य प्रदेशचे गृहमंत्र्यांना त्यांनी दला आहे.
यावेळी त्यांनी भाजपवर टीका करताना म्हणाल्या की, आशा जातीय, धार्मिक मुद्यावरून जर एखादा पक्ष राजकारण करत असेल तर, अशा पक्षाला मतपेटीतून उत्तर द्या असे लोकांनी त्यांनी आवाहन केले आहे.