मुंबई : मुंबईतील 9 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या (DCPs Transferred in Mumbai) करण्यात आल्या आहेत. नुकतंच याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या बदली आणि स्थगिती प्रकरणावरुन राजकारण सुरु होतं. त्यानंतर आता नुकतंच 9 DCP ( Deputy Commissioner of Police) अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आली आहे. यात आयपीएस आणि SPS (मपोसे) पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नाव – सध्या नेमणूक – नवीन नेमणूक
हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
दरम्यान मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. मात्र या बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना महत्त्व होते. या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
डॉ. रश्मी करंदीकर, शंकर शिंदे, परमजीत सिंग दहिया, संग्रामसिंग निशाणदार, प्रशांत कदम, शहाजी उमप, मोहन दहीकर अशा 12 उपायुक्तांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने गुरुवारी काढले होते, मात्र त्याला अवघ्या तीन दिवसात स्थगिती मिळाली होती. (DCPs Transferred in Mumbai)
संबंधित बातम्या :
मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या 12 उपायुक्तांच्या बदल्यांना गृहमंत्र्यांची तीन दिवसात स्थगिती