“विनायक राऊत खासदार आहे की आमचा ऑफिसबॉय”; भेटीगाठीच्या राजकारणावरून ‘या’ नेत्याने थेट लायकी काढली

| Updated on: Jan 03, 2023 | 7:58 PM

खासदार विनायक राऊत यांच्या त्या वक्तव्याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, विनायक राऊत यांनी आधी आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध चांगले करावे, नाही तर ते शिंदे गटात येण्यासाठी कसे आतूर आहेत.

विनायक राऊत खासदार आहे की आमचा ऑफिसबॉय; भेटीगाठीच्या राजकारणावरून या नेत्याने थेट लायकी काढली
Follow us on

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी रागवले आणि त्यांच्याकडून सर्व खाती काढून घेण्याचा इशारा दिला असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नारायण राणे यांच्यावर रागवले का असा सवाल केल्यानंतर नितेश राणे यांनी म्हणाले की, आम्हाला वाटत होतं की, विनायक राऊत हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार आहेत, मात्र ते नारायण राणे यांच्या कार्यालयामध्ये चहा द्यायले आहेत हे माहिती नव्हते असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

आमदार नितेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांची थेट लायकीच काढली आहे. जेवढी आपली लायकी आहे तेवढच त्यानी बोलावे अशी सडकून टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना त्यांच्या मंत्रीपदावरून आणि त्यांच्या पीएवरून जोरदार धारेवर धरले असे वृत्त जाहीर झाले होते.

त्यावर बोलताना नितेश राणे यांनी त्यांच्या पदावरून त्यांनी त्यांची लायकीच काढली आहे. आपल्याला वाटत होतं ते खासदार असतील मात्र ते नारायण राणे यांच्या ऑफिसमध्ये चहा द्यायले आहेत हे माहिती नव्हते अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

खासदार विनायक राऊत यांच्या त्या वक्तव्याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, विनायक राऊत यांनी आधी आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध चांगले करावे, नाही तर ते शिंदे गटात येण्यासाठी कसे आतूर आहेत.

हे जर मी सांगितले तर त्यांची गोची होईल असा टोलाही त्यांना त्यांना लगावला आहे. त्यामुळे राणे आणि राऊत हा वाद भविष्यात चिघळणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.