मुंबईः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वतःची शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा वाद मिटवण्यासाठी नितीन गडकरी स्वतः पुढे आले आहेत. ते म्हणाले, ‘शिवाजी महाराज आमचे देव आहेत. आपल्या पालकांपेक्षाही आपण त्याचे नाव अधिक आदराने घेतो. कोश्यारी यांच्या विधानावरून झालेल्या गदारोळानंतर पहिल्यांदाच नितीन गडकरी यांनी मौन सोडले आहे. दोन दिवसांपूर्वी भगतसिंग कोश्यारी म्हणाले होते की, शिवाजी महाराज म्हातारे झाले आहेत, आता नितीन गडकरी हे आजच्या युगात आमचे आदर्श आहेत.
मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले होते.
त्या वादावर पडदा टाकण्यासाठी आता नितीन गडकरी आता पुढे सरसावले आहेत. यावेळी या वादाविषयी बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आपण आपल्या आई वडिलांपेक्षाही जास्त आदराने घेतो असंही त्यांनी या वादावर बोलताना सांगितले. नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच या वादावर आपले मौन सोडले.
दोन दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते की, शिवाजी महाराज हे तर जुन्या काळातील आहेत, मात्र आताच्या काळातील नितीन गडकरी हे आपले आदर्श असल्याचे त्यांनी वक्तव्य केले होते.
राज्यपाल कोश्यारींच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जोरदार विरोध दर्शवण्यात आला होता.
त्याचबरोबर राज्यात भाजपबरोबर असलेल्या शिंदे गटातील काही नेत्यांनी या वादाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तर शिंदे गटाने राज्यपालांना महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात पाठवण्याची मागणी केली होती.
भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना म्हटले होते की, अगोदर तुम्हाला विचारले जायचे की तुमचा आदर्श कोण, त्यावेळी जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, आणि महात्मा गांधी यांची नावं सांगितली जात होती.
पण महाराष्ट्रासारख्या राज्याचा विचार केला तर आदर्शासाठी इतर ठिकाणी पाहायची गरज नाही. कारण महाराष्ट्रात अनेक आदर्श असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असले तरी आता बाबासाहेब आंबेडकर, नितीन गडकरी सारखे आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुनच वाद उफाळून आला होता.
राज्यपालांच्या वक्तव्यावरुन वाद उफाळून आल्यानंतर ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केल्यानंतर शिंदे गटावरही यावरुन टीका करण्यात आली.
शिंदे गटावर टीका झाल्यानंतर त्यातील काही आमदारांनी राज्यपालांची बदलीची मागणी केली. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या युतीला तडे जाण्याच्याआधीच नितीन गडकरी आपले मौन सोडत आपली भूमिका स्पष्ट केली.