Nitin Gadkari : नितीन गडकरी मुख्यमंत्री पदाचे दावेदार? एका हश्यात अनेकांची विकेट, म्हणाले तरी काय?

| Updated on: Nov 14, 2024 | 3:28 PM

Nitin Gadkari on CM Post : संख्याबळावर महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार नाही असे टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून खल सुरू आहे. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिक्रियेची पण चर्चा होत आहे. त्यांच्या एका हश्याने अनेकांची विकेट पडली आहे.

Nitin Gadkari : नितीन गडकरी मुख्यमंत्री पदाचे दावेदार? एका हश्यात अनेकांची विकेट, म्हणाले तरी काय?
नितीन गडकरी
Follow us on

सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या तोफा थंड व्हायला उणेपुरे काही दिवस उरले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. पण प्रचाराला म्हणावी तशी काही धार आली नाही. त्याच त्याच मुद्याभोवती निवडणूक फिरत आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. महाविकास आघाडी अथवा महायुती ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करता प्रचारात उतरली आहे. महाविकास आघाडीत संख्याबळावर मुख्यमंत्री जाहीर होईल असा दावा उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्या आधारे केला आहे. तर दुसरीकडे संख्याबळावर महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार नाही असे टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता, त्यांच्या एका हश्यानेच अनेकांची विकेट पडली आहे. काय म्हणाले गडकरी?

मुख्यमंत्री कोण होणार?

मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा राज्यात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतल्याने एकच गोंधळ उडला. त्यानंतर भाजपाकडून सारवासारव करण्यात आली. आता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. त्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री पदाबाबत त्यांचे स्पष्ट मत मांडले. त्यांनी इतर पण मुद्दांवर भूमिका जाहीर केली. निवडणुकीपूर्वी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या दिलखुलास हास्याने त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली.

हे सुद्धा वाचा

गडकरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?

नितीन गडकरी यांना राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी प्रश्नाचा रोख त्यांच्या लक्षात आला. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तेव्हा अनेकांची विकेट पडली. पण त्याचवेळी गडकरी यांनी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार नसल्याचे सांगीतले. मला मुख्यमंत्री व्हायचे नसल्याचे ते म्हणाले. जर कोणी आग्रह केला, मला संधी दिली तरीही मी मुख्यमंत्री होणार नसल्याचे ते म्हणाले. पक्षातील वरिष्ठ नेते मुख्यमंत्री कोण होईल, याचा निर्णय घेतील, अशी महत्त्वपूर्ण वक्तव्य त्यांनी केले.