दिल्ली निवडणुकांनंतर महागाई कडाडली, गॅस सिलेंडरच्या किंमतीत 145 रुपयांची वाढ

| Updated on: Feb 12, 2020 | 12:43 PM

महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला एका मोठा धक्का बसणार आहे. कारण, पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

दिल्ली निवडणुकांनंतर महागाई कडाडली, गॅस सिलेंडरच्या किंमतीत 145 रुपयांची वाढ
Follow us on

पुणे : महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला एका मोठा धक्का बसणार आहे. कारण, पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे (Gas Cylinder Rate Increased). इंडियन गॅसच्या विना अनुदानित असलेल्या गॅस सिलेंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली. दिल्ली विधानसभा निवडणुका पार पडताच गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे (Gas Cylinder Rate Increased).

दरवाढ किंवा घट ही महिन्याच्या 1 तारखेलाच होत असते. मात्र, अचानक दरवाढ केल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत सिलेंडरचा दर 721. 50 रुपये इतका होता. मात्र, आज तो वाढून 866.50 रुपये झाला आहे. पुण्यात काल 704 तर आज तब्बल 849 रुपये असा सिलेंडरचा दर आहे.

मुंबईत एका सिलेंडरमागे आता 829.50 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, दिल्लीतील सिलेंडरची किंमत 144.50 रुपयांनी वाढून 858. 50 रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये 149 रुपयांची दरवाढ झाली आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतीत 147 रुपयांची वाढ झाली असून आता गॅसच्या किमती 881 रुपये झाल्या आहेत.

दोन महिन्यात सामान्यांच्या खिशावर 200 रुपयांता बोजा

गेल्या डिसेंबर महिन्यात दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या विना अनुदानित असलेल्या सिलेंडरसाठी 695 रुपये मोजावे लागत होते. तर कोलकात्यात 725.50 रुपये द्यावे लागत होते. मुंबईमध्ये एका सिलेंडरमागे 665 रुपये तर चेन्नईमध्ये 714 रुपये मोजावे लागत होते. मात्र, अवघ्या दोन महिन्यांच्या आत सामान्यांच्या खिशावर तब्बल 200 रुपयांता बोजा वाढला आहे.