निवृत्ती बाबर, प्रतिनिधी मुंबई | 20 February 2024 : मराठा आरक्षणासाठी आता अवघ्या काही मिनिटात विशेष अधिवेशन सुरु होत आहे. पण त्यापूर्वीच राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची खणखणीत प्रतिक्रिया अंतरवाली सराटी येथून आली आहे. मराठा समाजावर इतर आरक्षण थोपविल्यास आंदोलनाची दिशा ठरविण्याचा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवे असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे पण आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास कोर्टात खेचण्याचा इशारा त्यांनी दिला.
कोणीच बाजू स्पष्ट नाही
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे तिसरं विशेष अधिवेशन आहे, मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणार आहे अशी आमची माहिती असल्याचे शेंडगे म्हणाले. कायद्यात टिकेल असा आरक्षण देणार असंही सांगताय तर दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असेही सांगण्यात येत आहे. हे बिल आहे त्याचा मसुदा कोणत्या आमदाराकडे नाही मंत्र्यांकडे नाही आम्ही देखील प्रयत्न केला, आम्हालाही सुद्धा मुसदा मिळालेला नाही. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास आमचाही विरोध नाही, पण ते करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी सर्वांची मागणी आहे.पण या कायद्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही यावर स्पष्टीकरण द्यायला कोणी तयार नाही.
50 टक्क्यांच्यावर आरक्षण कसं देणार?
राज्य सरकारच्या मानेवरती टांगती तलवार आहे. त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी दबाव असल्याचे ते म्हणाले. हा कायदा कोणत्या आधारावर टिकणार आहे याचं स्पष्टीकरण द्या, त्याचं काम सरकारचा आहे परंतु स्पष्टीकरण द्या की कसा धक्का लागणार नाही, अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा कायदा त्यांनी पास करावा, पण असं झालं नाही तर आम्ही कोर्टात या आरक्षणाला आव्हान देणार असल्याचे ते म्हणाले.
तर कोर्टात न्याय मागू
आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही कोणाला सोडणार नाही आम्ही कोर्टात न्याय मागू, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांना परवडणार नसेल, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवत असाल तर ओबीसी समाजाला आरक्षण द्यायला का अधिवेशन बोलवलं जात नाही. आजच्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचा प्रस्ताव का घेतला जात नाही, असा सवाल त्यांनी केला.
सल्लागारांना लाख लाख रुपये
मनोज जरांगे यांना सल्ला देण्यासाठी अनेकांची नियुक्ती केली होती त्यांना चार चार पाच पाच लाख रुपये दिले आहेत.जो आता यानंतर गोंधळ उडेल तो सरकारला महागात पडेल, अनेक हरकती आल्यापासून हरकतींचा विचार सरकारकडून झाला नाही. त्याला केराची टोपली राज्य सरकारकडून दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
आयोगाने फिक्सिंग केली
मागासवर्गीय आयोग जो आहे तो टोटल स्कॅम आणि फिक्सिंग आहे, अनेकांना या आयोगातून काढून टाकलं, मला अहवाल वाचू द्या मग मी त्यावर सही करतो म्हणून मेश्राम या सदस्यांना या आयोगातून काढून टाकलं. दहा-बारा दिवसात कोट्यावधी मराठ्यांचे सर्वेक्षण करणं हे ऐतिहासिक गोष्ट आहे, ही माहिती सत्य आहे की बोगस आहे लवकरच उघडकीस येणार आहे. जरा कायदा टिकला नाही तर किती वेळा सर्वेक्षण करणार आहे दुसऱ्या जाती महाराष्ट्रात नाहीयेत का, असा सवाल त्यांनी केला.