किरीट सोमय्या यांचे जुने व्हिडीओ ट्वीटरवर प्रचंड व्हायरल; संजय राऊत, अनिल परब यांचीही जुनी वक्तव्य व्हायरल

| Updated on: Jul 18, 2023 | 10:40 PM

सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांनी सोमय्यांविरोधात प्रतिक्रिया दिल्या. ट्वीटरवर मिम्सचा अक्षरशः पाऊस पडला.

किरीट सोमय्या यांचे जुने व्हिडीओ ट्वीटरवर प्रचंड व्हायरल; संजय राऊत, अनिल परब यांचीही जुनी वक्तव्य व्हायरल
Follow us on

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे ट्वीटरवर सध्या ट्रेंड सुरू झाला. किरीट सोमय्या, संजय राऊत आणि अनिल परब यांची जुनी वक्तव्य पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटानं आंदोलन सुरू केलं. सोमय्यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं. सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांनी सोमय्यांविरोधात प्रतिक्रिया दिल्या. ट्वीटरवर मिम्सचा अक्षरशः पाऊस पडला.

सावध राहण्याचा खडसे यांनी दिला होता सल्ला

किरीट सोमय्या यांची जुनी वक्तव्य पुन्हा व्हायरल होऊ लागली. सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडीओ आहे एकनाथ खडसे यांनी किरीट सोमय्या यांना दिलेल्या सल्ल्याचा. एका कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी किरीट सोमय्या यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता. कधी काय होईल, सांगता येत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. कधी जात्यात असतात. कधी सुपात असतात.

सोमय्या यांचे महिलांबद्दलचे आचार आणि विचार

खासदार असताना पश्चिम बंगालमधील महिलांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. लोकसभेत किरीट सोमय्या प्रचंड आक्रमक झाले होते. तो व्हिडीओ ट्वीटरवर पुन्हा एकदा व्हायरल झाला. सोमय्या यांचे महिलांबद्दलचे आचार आणि विचार असे कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आले.

किरीट सोमय्या हातोडा घेऊन जाताना

दापोलीतल्या साई रिसॉर्टवर जाताना किरीट सोमय्या हातोडा घेऊन गेले होते. अनधिकृत बांधकामाच्या तोडकाम प्रसंगी हातोडा नेला होता. सोमय्यांचा तोच हातोडा पुन्हा आता व्हायरल होऊ लागला. विरोधी पक्षाचे अनेक नेते सोमय्यांच्या आरोपांमुळे अडचणीत आले होते. मीडियासमोर येताना ते हिशोब मागायचे. तेच वक्तव्य चांगले गाजायचे. तेच वक्तव्य आता विरोधक व्हायरल करताना दिसतात.