मुंबई : मागील 2 दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यातच आता प्रभादेवी येथील साई भक्ती मार्गावर असलेल्या ओंकार इमारतीचे 2 मजले कोसळल्याची घटना घडली (Building collapse due to rain in Mumbai). आज सकाळी 11. 30 वाजताच्या सुमारास ही पडझड झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रभादेवी भागात जयप्रभा आणि ओंकार या दोन्ही तीन मजली इमारती तळमजल्यासह इमारती एकमेकांना लागून आहेत. या दोन्ही इमारती जुन्या आहेत. गेले 2 दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे यातील ओंकार इमारतीची पडझड झाली. यात इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भाग कोसळला. यावेळी घरात लोक राहत होती. इमारत कोसळल्याचं लक्षात येताच रहिवाशांमध्ये गोंधळ झाला. यानंतर या रहिवाशांनी तात्काळ इमारतीच्या खाली धाव घेतली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही इमारतींचा पुनर्वसनाचा वाद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पुढील धोका पाहता पालिकेने इमारत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर यांनी देखील घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
पालकमंत्री आदित्य ठाकरेंकडून इमारतींची पाहणी
पालकमंत्री आदित्य ठाकरे हे देखील प्रभादेवीतील ओंकार इमारतीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहचले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईतील मुसळधार पावसामुळे झालेले नुकसान हा क्लायमेट चेजचा इशारा आहे. जो पाऊस झालाय तो वादळी आहे. 48 तासात 500 मिमीचा पाऊस झालाय. हा जगाला इशारा आहे. विरोधी पक्षांचे आरोप हे हास्यास्पद आहेत.”
हेही वाचा :
मुंबईतील पाऊस आणि वारं याला चक्रीवादळच म्हणावे लागेल : आयुक्त इक्बाल चहल
Maharashtra Rain | बळीराजा सुखावला, महाराष्ट्रात सरासरीच्या 97.7 टक्के पाऊस
Mumbai Rains Live | मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर कायम, सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं पडली
Building collapse due to rain in Mumbai