घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई वन मेट्रोने तब्बल एक अब्ज म्हणजे 100 कोटी प्रवासी संख्येचा पल्ला गाठला आहे. हा विक्रम मुंबई वन मेट्रोने अवघ्या 264 दिवसात केला आहे. मुंबईला पूर्व ते पश्चिम जोडणाऱ्या मुंबईतील पहिल्या वहिल्या मुंबई वन मेट्रोची सुरुवात दहा वर्षांपूर्वी 8 जून 2014 रोजी झाली होती. या मेट्रोमुळे पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी जलद मार्ग उपलब्ध झाला आहे.या मार्गावर मुंबई वन मेट्रो बांधायला मात्र अनेक वर्षे खर्ची लागली होती. या वर्षात मुंबई वन मेट्रोने प्रवाशांना चांगली सेवा दिली असून तिची लोकप्रियता पश्चिम उपनगरात मेट्रो – 7 आणि मेट्रो – 2 अ ( Metro 2 A & 7 ) सुरु झाल्यानंतर आणखीनच वाढली आहे.
मुंबई वन मेट्रोचा ( Mumbai Metro One )कारभार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टर ( Reliance Infrastructure ) या कंपनीकडे असून हा देशातील पहिला खाजगी आणि सरकारी सहभागातून बांधलेला पीपीपी मॉडेलाचा प्रकल्प आहे. मुंबई मेट्रोवननेमध्ये अनेक प्रवाशांच्या उपयोगाच्या सुविधा सुरु केलेल्या आहेत.
विक्रमाची तारीख | प्रवाशाची संख्या दशलक्षमध्ये | किती दिवसात रेकॉर्ड केला |
---|---|---|
10 जुलै 2015 | 100 | 398 |
1 ऑगस्ट 2016 | 200 | 388 |
4 जुलै 2017 | 300 | 337 |
30 एप्रिल 2018 | 400 | 300 |
28 जानेवारी 2019 | 500 | 273 |
19 ऑक्टोबर 2019 | 600 | 264 |
1 मार्च 2022 | 700 | 864* |
24 फेब्रुवारी 2023 | 800 | 360 |
02 डिसेंबर 2023 | 900 | 281 |
22 ऑगस्ट 24 | 1000 | 264 |
मुंबई वन मेट्रोमधून सध्या दररोज 430 फेऱ्या चालवून सोमवार ते शुक्रवार अशी दररोज 5 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. पिक अवरला दर 3.5 मिनिटांनी एक ट्रेन सोडली जाते. तर नॉन – पिक अवरला दर 7 मिनिटांनी एक ट्रेन चालविली जाते. Mumbai Metro One मधून दररोज प्रवाशांची संख्या वाढतच आहे. मुंबई मेट्रो वन प्रवाशांना वर्ल्ड क्लास अनुभव प्रवाशांना देत असून वक्तशीरपणाही 99 टक्के वक्तशीपपणा मुंबई वन मेट्रोने राखलेला आहे.