अखेर रेणू शर्मांची बहीण करुणा यांनीही मौन सोडलं, धनंजय मुंडेंविरोधात गंभीर तक्रार

| Updated on: Feb 03, 2021 | 6:28 PM

Dhananjay Munde case | धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनीच आता एकदा तक्रार केली आहे.

अखेर रेणू शर्मांची बहीण करुणा यांनीही मौन सोडलं, धनंजय मुंडेंविरोधात गंभीर तक्रार
करुणा शर्मा यांची धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार
Follow us on

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात आता आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनीच आता एकदा तक्रार केली आहे. यापूर्वी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती तक्रार मागे घेतली होती.  (one more complain against Maharahstra Minister Dhananjay Munde by Karuna Sharma)

यानंतर आता धनंजय मुंडे यांनी ज्या महिलेबाबत आपण सहमतीने संबंधात होतो, त्या करुणा शर्मा यांनी मौन सोडलं आहे.  करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट (Chitrakut) बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

करुणा शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले जात नाही. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे सबंध असून त्यातून त्यांना दोन मुले झाल्याचं याआधी मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्य केलं होतं. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची करुणा शर्मा यांची मागणी आहे.

करुणा शर्मा यांचे आरोप काय?

करुणा शर्मा यांची गंभीर तक्रार आहे. करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट (Chitrakut) बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 यापूर्वी रेणू शर्मांची तक्रार

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. रेणू शर्मा यांच्या आरोपांनुसार 2006 पासून आपल्यावर अत्याचार सुरु आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे

धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एक फेसबूक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला आहे. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं आहे. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही.

रेणू शर्माची तक्रार मागे 

दरम्यान, 22 जानेवारीला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी धनजंय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं होतं.

(one more complain against Maharahstra Minister Dhananjay Munde by Karuna Sharma)

संबंधित बातम्या  

 करुणा शर्माबाबत धनंजय मुंडेंचा खुलासा, पण कोण आहेत करुणा शर्मा?

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण? 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली