मुंबई : झोमॅटो, फूडपांडा, उबर आणि स्विगी यासारख्या ऑनलाईन अन्नपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी लेखी उत्तरात दिली. ऑनलाईन अन्न पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. त्याबाबत सरकारकडून जयकुमार रावल यांनी याबाबत उत्तर दिलं.
मुंबईतील 366 ठिकाणची पाहणी करण्यात आली. तब्बल 122 कंपन्यांवर काम बंद करण्याबाबतची कारवाई करण्यात आली. स्विगी आणि झोमॅटो यांच्याविरूद्ध 26 खटले दाखल केले आहेत. एकूण 1 कोटी 51 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती जयकुमार रावल यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील स्विगी आणि झोमॅटोवरही अन्न आणि औषध पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आल्याचं रावल यांनी सांगितलं.
अन्नाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ऑनलाईन कंपन्या पुरवत असलेलं अन्न, ते बनवण्यात येत असलेलं ठिकाण, स्वच्छता, अन्न खाल्ल्यामुळे होणारे त्रास यामुळे या कंपन्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. त्यांच्यावर सरकारकडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत आज अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी लेखी उत्तरात दिली.
संबंधित बातम्या
पॅकिंग फोडणाऱ्या डिलिव्हरी बॉयबाबत झोमॅटोने काय केलं?
‘झोमॅटो’चा आधी दुसऱ्याचे पदार्थ खातानाचा व्हिडीओ, आता नवा व्हिडीओ