मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vikhare)म्हणाले, महाराष्ट्रात शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल केल्या जातात. झुनका भाकर केंद्र बंद केली जातात. त्यांच्या व्यवसायावरती गदा आणण्याचं काम केलं जातंय. तुम्ही आमच्या पक्षात या नाहीतर तुमचं एन्काउंटर करू. या पक्षात सहभागी झाले नाहीत, तर तुम्हाला तडीपार करू. अशा पद्धतीनं दडपशाही करण्याचं काम सरकार करते. या विरोधात मोर्चा काढल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं.
दीवाळी पहाट हा कार्यक्रम कित्तेक वर्षांपासून करत होतो. कोरोनाकाळात ब्लड कॅम्प आयोजित केलं. गेल्या दोन वर्षात कॅम्प लावले. हा कार्यक्रम करत असताना यंदा कागदपत्र मागितली. शेवटी सांगितलं की, परमिशन दिली आहे, असं सांगितलं.
ठाण्यात शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं. शाखा प्रमुख, नगरसेवक, महापौर, आमदार अशा उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अशा लोकांना त्रास देण्याचं काम या माध्यमातून करतात. या ठाण्यातली जनता सुज्ञ आहे. त्यांची जागा ते दाखवतील, असंही राजन विचारे म्हणाले.
शिवसैनिक हा जनतेला सुरक्षा देण्यासाठी असतो. आम्ही स्वतःच रक्षण करण्यासाठी सक्षम आहोत. त्यांना जे काही करायचं करू द्या. अशा गोष्टींना आम्ही भिक घालत नाही. सुरक्षेसाठी काही करावं लागेल, असं काम आमच्या हातून झालेलं नाही. आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असतो.
आम्हाला घाबरण्याची गरज नाही. गेल्या अडीच ते तीन महिन्यात सण साजरे केले जातात. पण, सण साजरा करण्यासाठी जनतेला दिलासा दिला पाहिजे. त्यासाठी सरकारचं पाऊल असलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.