मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नवी मुंबईसह ठिकठिकाणी ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेने ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह नवी मुंबईतील रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी या दोन्ही महापालिकेने हे पाऊल उचललं आहे. (Oxygen production by Mumbai and Navi Mumbai Municipal Corporation)
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. याबाबतच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, म्हणून महापालिकेने हे पाऊल उचलेल आहे. मुंबईतील जम्बो कोविड सेंटर, कुर्ल्यातील भाभा रुग्णालय, गोवंडीतील शताब्दी रुग्णालय अशा जवळपास 12 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेनेही ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच याबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी चाचपणी केली आहे. नवी मुंबईत ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता मनपाकडून ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. नवी मुंबईत ऑक्सिजन निर्मितीसाठी तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी महापालिकेने द्रवरुप ऑक्सिजनच्या टाक्या बसवून साठवण करून ठेवण्याचा मार्ग शोधला आहे.
नवी मुंबईत दिवसाला 200 ऑक्सिजन सिलेंडरची मागणी आहे. सध्या ऑक्सिजनवर 1.5 ते 2 करोड रुपये खर्च केला जात आहे. गेल्या सहा महिन्यात नवी मुंबई महापालिकेला केवळ ऑक्सिजनसाठी 40 कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.
ऑक्सिजनच्या एका सिलेंडरमध्ये 175 क्यूबिक मीटरचा साठा असतो. त्यानुसार दिवसाला एका केंद्रावर 14 सिलेंडर लागतात. तर लिक्विड गॅस सिलेंडर मध्ये 25 गॅस सिलेंडर बसतात. त्यामुळे लिक्विड गॅस सिलेंडर फायद्याचे ठरत आहेत. दरम्यान नवी मुंबईत एका व्यक्तीला 7.2 लीटर प्रति मिनिट इतका ऑक्सिजन द्यावा लागत आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. (Oxygen production by Mumbai and Navi Mumbai Municipal Corporation)
Coronavirus In India : कोरोनाच्या तिसऱ्या म्युटेंटची एन्ट्री? देशवासियांची धास्ती वाढवणारी बातमी https://t.co/HqpDKL6Mx2 #CoronavirusIndia | #CoronaSecondWave | #coronanewstrain
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2021
संबंधित बातम्या :