मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन कार एकमेकांना धडकल्या, एकाचा मृत्यू

| Updated on: Mar 15, 2021 | 12:53 PM

पालघरजवळ (Palgahar Accident Of Two Cars One Died Three Injured) झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन कार एकमेकांना धडकल्या, एकाचा मृत्यू
Palghar Accident
Follow us on

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (15 मार्च) सकाळी पालघरजवळ (Palgahar Accident Of Two Cars One Died Three Injured) झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर झाले आहेत. या घटनेत कारचा चक्काचुर झाला आहे. अपघातानंतर जखमींना तात्काळ मनोर ग्रामीण रुग्णल्यात प्राथमिक उपचारार करण्यासाठी नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी अन्यत्र पाठविण्यात आले आहे. या भीषण अपघातामुले महामार्गावरीक वाहतूक काही काळ खोळंबली होती (Palgahar Mumbai-Ahmedabad National Highway Accident Of Two Cars One Died Three Injured).

दोन कारचा भीषण अपघात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील मनोर जवळील दुर्वेस गावाच्या हद्दीत दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी 15 मार्चला सकाळी आठ ते साडे आठच्या सुमारास दुर्वेस गावाजवळ विठ्ठल कामत हॉटेलच्या परिसरात हा अपघात घडला आहे.

गुजरात बाजूने मुंबईकडे भरधाव वेगाने येणारी एक कार दुभाजक ओलांडून अचानक विरुद्ध दिशेला सुसाट गेली. दुभाजक ओलांडून दुसऱ्या दिशेला आलेल्या या कारने गुजरातकडे जाणाऱ्या एका कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार आणि भयानक होती की यात समोरच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

त्या कारमध्ये अडकून वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. शोभीत कुमार दास (वय 41) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.  मयत इसमा व्यतीरिक्त तिघेजण जखमी असून जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तिघांनाही मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

वाहतूक काही काळ खोळंबली

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी पालघरजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक काही काळ खोळंबली होती. माात्र, पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त गाड्या बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली असल्याची मााहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ –

Palgahar Mumbai-Ahmedabad National Highway Accident Of Two Cars One Died Three Injured

संबंधित बातम्या :

PHOTO | नाशिकसह साताऱ्यात भीषण अपघात, 12 जण जखमी