मुंबईः चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तापलेल्या राजकारणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत भाजपमधील नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यांनतर राजकारणाबरोबर सामाजिक वातावरणही तापले आहे. त्यावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही निशाणा साधला आहे.
महापुरुषांवर वक्तव्य करून वाद निर्माण केलेल्या नेत्यांवरच त्यांनी थेट निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांनी बोलताना म्हणाल्या की, विरोधकांसाठी जसे नियम आहेत, तसेच सत्ताधाऱ्यांसाठीही नियम आहेत.
फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात त्यांच्याविषयीच जर अशी वादग्रस्त वक्तव्य करून जर वातावरण गडूळ होत असेल तर नक्कीच हे बघून मन खिन्न होतं असंही त्यांनी मत व्यक्त केलेे.
त्यामुळे महापुरुषांविषयी बोलणं हा आपला अधिकार आहे, पण त्यांच्याविषयी बोलताना आपण आपल्या मर्यांदा सांभाळल्या पाहिजेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राजकीय व्यक्ती महापुरुषांविषयी बोलताना आपण ते चांगलं बोलत असतील, आणि त्यामध्ये एकादा शब्द इकडे तिकडे झाला तर मात्र त्यावर आपण वाद निर्माण करतो.
त्यामुळे हाही महापुरुषांचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यामधून प्रेरणा घेऊन त्यांच्यासाठी आपण बोलायचं असतं
एखादी व्यक्ती चांगला बोलतोय पण एकादा शब्द वाईट बोलतोय त्याची आपण वाट बघतोय आणि त्याचं आपण बोभाटा करतोय हे सुद्धा अवमान करण्यासारखं आहे.
राजकीय व्यक्तींच्या वक्तव्याचा आपण बोभटा करत असला तरी तोही एक प्रकारचा महापुरुषांचा अवमान होतो हेही आपण विसरतो असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
त्यामुळे राजकीय व्यक्तींनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी बोलताना आपल्याला त्यांच्या कार्याच्या सन्मान करता येत नसेल तर त्यांच्या कार्याची आपण थट्टाही करू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे.