VIDEO: भाजपने विधान परिषदेची संधी पुन्हा डावलली; पंकजा मुंडे म्हणाल्या…

| Updated on: Nov 23, 2021 | 2:15 PM

भाजपने विधान परिषदेसाठी चार उमेदवार जाहीर केले आहेत. यावेळी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनाही पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे.

VIDEO: भाजपने विधान परिषदेची संधी पुन्हा डावलली; पंकजा मुंडे म्हणाल्या...
पंकजा मुंडे
Follow us on

मुंबई: भाजपने विधान परिषदेसाठी चार उमेदवार जाहीर केले आहेत. यावेळी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनाही पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे. मला कसलीही अपेक्षा नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. मला कसलीही अपेक्षा नाही. पदामुळे परिणाम होईल असं वाटत नाही. माझं काम सुरू आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

अध्यादेश केवळ दिखाऊपणा

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरूनही सरकारला धारेवर धरले. ओबीसींचं आरक्षण रद्द झालं. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेलं आहे. इम्पिरिकल डेटा देण्यासाठी मागणी होत असताना 15 महिन्यात 7 वेळा तारखा घेण्यात आल्या. वेळकाढूपणा करण्यात आला. या सरकारने ओबीसींच्या पाठित खंजीर खुपसलं आहे. निवडणुकीच्या अध्यादेशासाठी इम्पिरीकल डेटा महत्त्वाचा आहे. मात्र, हा अध्यादेश हा केवळ दिखाऊपणा आहे, असं त्या म्हणाल्या.

नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या

आता अधिवेशन येत आहे. त्यामुळे सरकारने ओबीसी आरक्षणासाठी कालावधी ठरवून घेतला पाहिजे. सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायलाच हवा. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचं नुकसान होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी, असंही त्यांनी सांगितलं.

तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही

ओबीसी आंदोलनात सुसुत्रता आणायला हवी. एका छत्राखाली सगळ्यांनी यायला हवं. प्रकाश शेंडगे यांना शुभेच्छा. पण सगळ्यांनी एकत्र सरकारवर दबाब टाकायला हवा, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

एसटी कामगारांची दिवाळी अंधारात

यावेळी त्यांनी एसटीच्या संपावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. हे सरकार एसटी कामगारांशी संभाषण करत नाही. या सरकारला अहंकार आहे. एसटी कामगारांची दिवाळी अंधारात गेली. या कामगारांच्या मदतीला कोणीही गेलं नाही. आमदार आणि खासदारांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. आमचे कार्यकर्ते गेले तेव्हा नेत्यांनी बोलायची तयारी केली, असं त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

‘नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी सरकारची अवस्था, प्रीतम मुंडेंची टीका, ओबीसी आरक्षणावरुन घणाघात

राज्य सरकारनं बहुजनांना अंधारात लोटलं, OBC आरक्षणासाठी अध्यादेश काढून संरक्षण देण्याचं ढोंग, पंकजांचा घणाघात

तुम्हाला इम्पिरिकल डेटाची व्याख्या तरी माहीत आहे काय?; पंकजा मुंडेंनी सांगितला अर्थ