नवी मुंबई : पनवेल महापालिका क्षेत्रात आता क्लस्टर कंटेन्मेंट झोन आणि कंटेन्मेंट झोन वगळून इतर भागातील लॉकडाऊन संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार, 22 जुलैला सकाळी 5 वाजल्यापासून ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु होईल, तर क्लस्टर कंटेन्मेंट झोन आणि इतर कंटेन्मेंट झोनमध्ये 31 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहील. (Panvel Municipal Corporation announces Mission Begin Again Unlock except Containment Zones)
‘कोव्हिड19’चा प्रसार थांबवण्यासाठी 3 जुलै रात्री 9 वाजल्यापासून 14 जुलैच्या सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर ही मुदत 24 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्यात आली होती.
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील क्लस्टर कंटेन्मेंट झोन आणि इतर कंटेन्मेंट झोनमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तिथे लॉकडाऊन सुरु ठेवणे आवश्यक आहे, असे सांगत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पालिकेच्या इतर क्षेत्रातील लॉकडाऊन उठवण्याचे आदेश जारी केले. हेआदेश 22 जुलै 2020 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून लागू होतील.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
आदेशात नमूद केलेल्या क्लस्टर कंटेन्मेंट झोन आणि इतर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 31 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहील.
दुकाने सम-विषम तत्वावर
कंटेन्मेंट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु राहील. यामध्ये प्रामुख्याने मॉल्स, मार्केट आणि कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठा आणि दुकाने सम-विषम (P-1 व P-2) तत्वावर चालवण्यास परवानगी असेल. म्हणजेच रस्त्याच्या एका बाजूला दुकाने, लेन, पॅसेज इत्यादी सम तारखांना उघडले जातील. तर दुसऱ्या बाजूची दुकाने विषम तारखेला उघडली जातील. (Panvel Municipal Corporation announces Mission Begin Again Unlock except Containment Zones)
दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडी राहतील. P-1 व P-2 हे संबंधित प्रभागाचे प्रभाग अधिकारी किंवा इन्सीडंट कमांडर ठरवतील. एपीएमसी मार्केट आणि मासळी बाजार मात्र बंद राहील. कंटेन्मेंट क्षेत्रामध्ये याआधीच्या आयुक्तांच्या आदेशानुसार जाहीर केल्याप्रमाणे लॉकडाऊनचे सर्व निर्बंध कडकपणे लागू राहतील.
हेही वाचा : पुण्यात 23 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवणार नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी निर्बंध : जिल्हाधिकारी
या कालावधीत लॉकडाऊनचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती/संस्था यांच्यावर साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अधील कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता यामधील कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल असे उपायुक्त-जनसंपर्क जमीर लेंगरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
संबंधित बातम्या
पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार
(Panvel Municipal Corporation announces Mission Begin Again Unlock except Containment Zones)