मुंबई: मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. परमबीर सिंह यांना मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहावं वाटलं याचं मूळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 18 मार्चला लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आहे. (Parambir Singh letter why ex Mumbai Commissioner wrote letter to Chief Minister Uddhav Thackeray about Anil Deshmukh)
अनिल देशमुख यांनी लोकमत वृत्तपत्राला 18 मार्चला दिलेल्या मुलाखतीमध्ये माझ्या कार्यालयाकडून गंभीर चूका झाल्याचं म्हटलं. 1. मुंबई पोलीस आणि माझ्याकडून अँटिलिया स्फोटक प्रकरणाच्या तपासामध्ये गंभीर चुका झाल्याचं म्हटलं. 2. त्या गंभीर चुका माफ करण्यासारख्या नाहीत.3 माझी बदली प्रशासकीय मुद्यांवर झाली नसल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं, असा उल्लेख मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील पाचव्या मुद्यामध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे.
अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घ्या; देवेंद्र फडणवीसांची मागणी
विरोधी पक्षनेते हे सगळीकडून माहिती घेत असतात. गटबाजी ही प्रत्येक ठिकाणी असते. पोलीस आयुक्तालयातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या म्हणून ही बदली करण्यात आली. चौकशीतून काही गोष्टी समोर आल्या त्या माफ करण्यासारख्या नाहीत. त्यामुळेच चौकशीत बाधा येऊ नये यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसून आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपांवर ट्विट करत पलटवार केला आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत होते. हे होत असताना त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून दिसत होती. हे असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.
चौकशीपासून बचावासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप, अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंह यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Video : Parambir Singh letter | परमबीर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र जसंच्या तसंhttps://t.co/ntbW553C75#ParambirSinghletter #AnilDeshmukh
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2021
संबंधित बातम्या:
(Parambir Singh letter why ex Mumbai Commissioner wrote letter to Chief Minister Uddhav Thackeray about Anil Deshmukh)