मुंबई : “सध्याची परिस्थिती पाहता प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्याच्या ओळी आठवतात ‘पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे’. वातावरण बापाच्या आगमनाने अतिशय प्रसन्न झालेलं आहे. पण हे कोरोनाचं जे सावट आहे त्यात शासनाची नियमावली आलेली आहे. तिचा आदर राखून मंडळाने सर्व मंडळ सॅनिटाईझ करण्याची प्रक्रिया केली आहे. वारंवार प्रत्येक तीन दिवसांनी महापालिकेने सांगितलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. मंडळांमध्ये मर्यादीत कार्यकर्ते ठेवायचे आहे त्याची ही योजना झालेली आहे”, अशी माहिती परेलचा राजा मंडळाचे अध्यक्ष बबन शिरोडकर यांनी दिली. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलाय. त्यापार्श्वभूमीवर यांनी परेलचा राजा गणपती मंडळाच्या तयारीबाबत आणि शासन नियम पाळून यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केला जाईल याची माहिती दिली.
“या कोरोनाच्या सावटामुळे एकंदरच जनतेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे दुकानदार, वर्गणीदार यांच्याकडे समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. गेले दोन वर्ष मंडळाने वर्गणी न काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. मंडळाचे सेविंग आहेत त्यामधून उत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाने आत्ताच चिपळूण येथे पूरग्रस्तांसाठी मदतीचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमांतर्गत चाळीस कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख असे अल्पशी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यानंतर विभागात पण कोरोनाचा संकट मध्यमवर्गीय वरती सुद्धा कोसळलेला आहे. त्यामुळे त्यांना ही मदत करण्यात आली आहे. विभागाचे वर्गणीदार आहेत परंपरेने या वर्षी 75 वं परेलच्या राजाचं अमृत वर्ष आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
“मंडळ आरोग्य शिबीर राबवणार आहे. त्यात नेत्रचिकित्सक आहेत मोतीबिंदु ऑपरेशनची नोंदणी करुन घेणार आहे. तसेच, रक्तदान शिबिर आयोजित मंडळातर्फे करण्यात येणार आहे. येत्या 13 तारखेला मधुमेह शिबिर स्त्रीरोगतज्ञ येणार आहे. तिथे या विभागातील ज्या महिला वर्ग आहे त्यांच्याकडे मंडळाने विशेष लक्ष देण्याच प्रयत्न केलेला आहे. स्त्री रोग तज्ञ यांच्या माध्यमातून ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील त्याच्यावर उपाय योजना केल्या जाणार आहेत असं मंडळाचे कार्य चालू आहे. तसेच मोफत लसीकरण घेण्याचा मंडळाचा मानस आहे त्याविषयी चर्चा चालू आहे योग्य वेळेला मंडळ जाहीर करेल”, असंही ते म्हणाले.
“शासनाचे नियमावलीनुसार दर्शन ऑनलाईनच राहणार आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 24 तास दर्शनाची व्यवस्था केली आहे. जवळजवळ 80 टक्के कार्यकर्त्यांचं व्हॅक्सिनेशन करुन घेतलेला आहे, जे प्रमुख फळीमध्ये राबत आहे. सध्या आणि इतर काही जे आहेत, त्यांच्या प्रोसेसमध्ये आहे लसीकरणाची गर्दी आणि उपलब्धतेमध्ये थोडा उशीर होत आहे. पण, जवळजवळ 80 टक्के कार्यकर्त्यांच पूर्ण लसीकरण करुन घेतलेलं आहे”.
“विसर्जनाची जी नियमावली आलेली आहे, मैदानामध्ये कृत्रिम तलाव तयार केलेला आहे, बाप्पाच्या चरणी एकच सांगणे आहे या मुंबईवर महाराष्ट्रावर देशावर जे कोरोनाचं संकट आलेला आहे. नुसतं आरोग्य पुरता मर्यादित न राहता लोकांच्या आर्थिक जीवनावर परिणाम करतो आहे. खूप मोठं संकटे मध्यमवर्गीय लोकांवर गरीब कुटुंबावर उद्भवलेला आहे. लोकांच्या नोकऱ्या उद्योगधंदा सगळीकडे परिणाम झालेला आहे. तर हे संकट निश्चितच बाप आमचा ऐकेल अशी आम्हाला खात्री आहे. हे संकट त्यांनी दूर करावं आणि पुन्हा एकदा या मुंबईला महाराष्ट्राला की सुवर्ण दिवस दाखवावे महाराष्ट्राला ते सुवर्ण दिवस दाखवावे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे”, अशी प्रार्थना बबनराव शिरोडकर यांनी बाप्पाच्या चरणी केली.
PHOTO | हे आहेत लालबागाच्या राजाचे नवीन दागिने, 4 फूट मूर्तीप्रमाणे केले आहेत तयारhttps://t.co/U5QfAZnPFf#LalbaugchaRaja |#Ornaments |#New |#4FootIdol
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2021
संबंधित बातम्या :
बाप्पाची आरती, गणपती बाप्पा मोरयांचा गजर, टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना