मुंबई : रॅगिंगमुळे आत्महत्या केलेल्या डॉ पायल तडवी यांच्या कुटुंबीयांनी नायर हॉस्पिटलबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
कुटुंबीयांच्या मागण्या रास्त आहेत. आरोपी महिलांना निलंबित केलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मात्र आरोपी मुली पसार झाल्या आहेत. कुणालाही माफी नाही, ज्यांनी चूक केलीय, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असं आश्वासन यावेळी गिरीश महाजन यांनी पायलच्या कुटुंबीयांना दिलं.
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. रॅगिंग कायद्यात काही सुधारणा करता येईल का, याबाबतची विवेचन सुरु आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं गिरीश महाजन म्हणाले.
कुटुंबियांच्या मागण्या रास्त आहेत. संबंधित मुली पहिल्या दिवसापासून फरार आहेत. पोलीस त्यांना शोधत आहेत. रॅगिंगविरोधी समितीने आपला अहवाल पाठवला आहे. त्यानंतर कठोर कारवाई होईल. आरोपी तिन्ही मुलींचे निलंबन करण्यात आले आहे. यातून कुणालाही माफी मिळणार नाही.
कुटुंबीयांची मागणी
दरम्यान, पायलच्या आत्महत्येमुळे हतबल झालेली पायलच्या आईने एकच हंबरडा फोडला. माझ्या मुलीचा जीव नायर हॉस्पिटल परत आणू शकणार आहे का, असा थेट प्रश्न पायलच्या आईने केला. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कुटुंबियांनी नायर हॉस्पिटलबाहेर आंदोलन केलं. ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, आरोपी डॉक्टरांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, आरोपी मुलींची डीग्री रद्द करावी, अशी मागणी डॉ. पायलच्या आईने केली.
माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या समाजाचे आणि माध्यमांचे आभार. माझ्या मुलीला न्याय मिळावा. ज्या मुलींनी तिचा छळ केला, त्यांना अटक करुन त्यांची नोंदणी रद्द करा, त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या. त्याशिवाय येथून हलणार नाही. पोलिसांनी 7 दिवस झाले काहीही कारवाई केलेली नाही किंवा संपर्क साधला नाही, असं पायलची आई म्हणाली.
पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत. नायर हॉस्पिटल माझ्या मुलीला परत देणार का? मी डिसेंबरमध्ये पोलिसात जाऊन तक्रार केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
आम्ही १३ तारखेला सकाळपासून तक्रार देण्यासाठी बसलो होतो. पण सुरक्षारक्षकांनी आम्हाला डिनला भेटू दिले नाही. ते व्यस्त असतात, अशा तक्रारी घ्यायला ते मोकळे नाहीत, असं उत्तर दिलं होतं, असा आरोप पायलच्या आईने केला.
डॉ. पायलचा भाऊ अपंग, आईला कॅन्सर होता त्यावर पायलनेच प्रयत्न करून उपाय केला. वडिलांना वचन दिलं होतं की वडिलांनंतरही अपंग भावाला सांभाळेल, अशी आठवण पायलच्या आईने सांगितली.
Dr Salman, Payal Tadvi’s (who committed suicide on May 22 after facing harassment at the hands of 3 senior doctors) husband: We want govt to intervene, police is not taking any action. It is possible Payal was murdered by the 3 women doctors. #Mumbai pic.twitter.com/oYPt3ki8Cl
— ANI (@ANI) May 28, 2019
रॅगिंगला कंटाळून पायलची आत्महत्या
मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीने 22 मे रोजी आत्महत्या केली. पायल तडवी असं या विद्यार्थीनीचे नाव आहे. पायलवर वरिष्ठ डॉक्टर सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून पायलने गळफास घेत आत्महत्या केली. पायलला सतत ती आदिवासी असल्याने हिणवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पायल मूळची जळगावची रहिवासी होती. आदिवासी समाजातील पायल ताडवी एका गरीब घरातून वैद्यकी य शिक्षणासाठी मुंबईत आली होती. नुकतेच तिचे लग्नही झाले होते. पण ही सर्व स्वप्न आता एका क्षणात उद्धवस्त झाली आहेत. कारण पायलने नायर रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केली.
आतापर्यंत काय काय झालं?
22 मे – रॅगिंगमुळे डॉ. पायल तडवीची आत्महत्या
22 मे – रॅगिंग करणाऱ्या महिला डॉक्टर पसार – डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महीरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल
25 मे – नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक
25 मे – विद्यार्थ्यांचं आंदोलन, दोषींना शिक्षेची मागणी
26 – पायलचं व्हॉट्सअप चॅट समोर
27 मे – महिला आयोगाकडून दखल
27 मे – आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन डॉक्टरांचे निलंबन, मार्डची कारवाई
27 मे – पायलच्या मूळगावी जळगावात निवेदने
28 मे – पायलच्या कुटुंबीयांचं नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन
28 मे – वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन कुटुंबीयांच्या भेटीला
संबंधित बातम्या
डॉ. पायल तडवी आत्महत्या : आतापर्यंत काय काय झालं?
रॅगिंगला कंटाळून डॉक्टर तरुणीची नायर रुग्णालयात आत्महत्या
डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येपूर्वीचं व्हॉट्सअॅप चॅट टीव्ही 9 च्या हाती