मुंबई : सत्ताबदलाआधी ईडीनं ज्या ज्या नेत्यांची चौकशी केली त्या नेत्यांवरील आरोपांचं पुढं काय झालं. त्यांच्यावरील आरोपांचा तपास कुठंवर पुढं सरकला. त्यासाठी आता ईडी अधिकाऱ्यांच्या विरोधातच याचिका दाखल करण्यात आली आहे. ईडीनं चौकशी केलेल्या आरोपांसंदर्भात चौकशी करून अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेकांविरोधात चौकशी करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. सत्ताबदलाआधी ईडीनं ज्या नेत्यांची चौकशी केली त्या चौकशीचं सत्ताबदलानंतर काय झालं, असा प्रश्न या याचिकेत आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सत्ता बदलानंतर आरोपांचं काय केलं. असा रिपोर्ट सादर करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ईडीनं काही जुन्या शिवसैनिकांवर कारवाई केली. त्यांना समन्स पाठविले गेले. त्यानंतर शिवसेना फुटली. वेगळा गट स्थापन झाला.
त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गट जाईन केला. भाजपबरोबर त्यांनी हातमिळवणी केली. त्यानंतर ईडीची कारवाई थांबली. ईडीच्या प्रामाणिकपणावर हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्याचं याचिकाकर्ते म्हणाले.
शिंदे-भाजप सरकार येण्याआधी भावना गवळी, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, आनंदराव अडसूळ या नेत्यांमागे गैरव्यवहाराच्या आरोपात चौकशी लागली. सध्या हे सर्व नेते शिंदे गटात आहेत. आता सरकारचा भाग आहेत.
त्यावेळी किरीट सोमय्या आणि भाजपनं आरोप केले होते. प्रताप सरनाईक यांनी घोटाळा केला आहे. खोतकर यांनी लूट माजविली आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले होते.
यशवंत जाधव यांच्या चौकशीला गती देण्यात आली होती. किरीट सोमय्या यांनी त्यावेळी पाठपुरावा केला होता. आता काय झालं, असं विरोधक विचारत आहेत. भावना गवळी यांनी १०० कोटी रुपये कुठून काढले कुठं नेले, असा सवालही किरीट सोमय्या त्यावेळी विचारत होते. आता या सर्व चौकशांचं काय झालं, असं याचिकेत म्हटलंय.