मुंबई : सौदी अरेबियातील तेल कंपनी सौदी अरामकोच्या दोन प्लांटवरील ड्रोन हल्ल्याचे (Saudi Aramco Drone Attack) परिणाम भारतात दिसू लागले आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत. गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Prices in India) वाढ होत आहे. देशातील अनेक ठिकाणी पेट्रोलची किंमत प्रति लीटर 80 रुपये, तर डिझेलची किंमत प्रति लीटर 70 रुपये झाली (Petrol Diesel Prices in India) आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा फटका सर्वसामन्यांना बसणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या (Petrol Diesel Prices in Mumbai) किंमतीत 27 पैशांनी वाढ झाली असून सध्या पेट्रोलचा दर 79.29 रुपये आहे. तर डिझेलचे 22 पैशांनी वाढल्या असून डिझेलची किंमत प्रति लीटर 70.01 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम सध्या पेट्रोल डिझेलवर झाल्याचा पाहायला मिळत आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 73.91 रुपये, कोलकाता मध्ये प्रति लीटर 76.60 रुपये, मुंबईत 79.29 रुपये आणि चेन्नईत 76.83 रुपये झाली आहे. तसेच डिझेलच्या किंमतीही वाढल्या असून दिल्लीत डिझेल प्रति लीटर 66.93 रुपये, कोलकाता 69.35 रुपये, मुंबईत 70.01 रुपये आणि चेन्नईत 70.76 रुपये प्रति लीटरने डिझेलचीच विक्री होत आहे.
देशात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत पाहायला मिळत आहे. परभरणीत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 81.51 रुपये आहे. तर डिझेलचा दर 81.40 रुपये आहे. त्याशिवाय नागपूरमध्ये रविवारी पेट्रोलचे दर 79.79 रुपये होता. तर आज नागपुरात पेट्रोलची किंमत 80.08 रुपये झाली आहे.
सौदी अरामकोवर ड्रोन हल्ला
जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला (Saudi Aramco Drone Attack) झालाय. सौदी अरेबियातील या हल्ल्यानंतर भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. हुती या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या संघटनेला इराणचा पाठिंबा असल्याचा आरोप होतोय. सौदी अरामकोच्या दोन तेल प्लांटवर ड्रोन हल्ला (Saudi Aramco Drone Attack) करण्यात आला. हे दोन प्लांट अब्कॅक आणि खुरैस भागात आहेत. जवळपास दहाच्या आसपास ड्रोन पाठवण्यात आल्याचं बोललं जातंय.
काही महिन्यांपूर्वीच फुटीरतावादी संघटनांनी सौदी अरेबियातील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र डागले होते. हुती या संघटनेने काही दिवसांपूर्वी अरामकोच्या प्राकृतिक गॅस केंद्रावरही हल्ला केला होता. या कंपनीवर कायम दहशतवादी हल्ल्याचं सावट असतं. 2006 मध्ये अलकायदा या दहशतवादी संघटनेकडून आत्मघातकी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, जो अयशस्वी ठरला.