राखी सावंतचा पाकिस्तानी ध्वजासोबतचा फोटो व्हायरल

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच आपल्या भूमिकांऐवजी इतर वादांमुळेच चर्चेत असते. यावेळीही ती अशाच एका कारणाने चर्चेत आहे. राखी सावंतचा पाकिस्तानी ध्वजासोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत राखी एका नदीच्या किनाऱ्यावर उभी आहे. तिने आपल्या छातीवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज घेतलेला दिसत आहे. राखीचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक लोक संतापले. मात्र, […]

राखी सावंतचा पाकिस्तानी ध्वजासोबतचा फोटो व्हायरल
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच आपल्या भूमिकांऐवजी इतर वादांमुळेच चर्चेत असते. यावेळीही ती अशाच एका कारणाने चर्चेत आहे. राखी सावंतचा पाकिस्तानी ध्वजासोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत राखी एका नदीच्या किनाऱ्यावर उभी आहे. तिने आपल्या छातीवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज घेतलेला दिसत आहे.

राखीचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक लोक संतापले. मात्र, राखीने या फोटोसोबत दिलेले कॅप्शन वाचल्यानंतर त्यांना त्या फोटोमागील सत्यही समजले. राखी सावंतने आपला हा फोटो शेअर करताना लिहिले आहे, “मला माझा भारत देश खूप आवडतो. मात्र, हा फोटो माझा आगामी चित्रपट ‘धारा 370’ मधील आहे. हा पाकिस्तानचा सेट आहे. या चित्रपटात कलम 370 विषयी आणि काश्मीरच्या पंडितांवर मांडणी करण्यात आली आहे.”


“मी या चित्रपटात एका पाकिस्तानी मुलीची भूमिका करत आहे. तुम्ही माझा पोशाख तपासू शकता. ज्या दहशतवादी संघटना लहान मुलांना जिहादी बनवण्याचे काम करतात, त्यांचा भांडाफोड करण्याचे काम माझी भूमिका करते”, असेही राखीने सांगितले.

पाकिस्तानी तरुणीने व्हिडीओवर आक्षेप घेतला

राखी सावंतने सोशल मीडियावर टाकलेल्या एका व्हिडीओवर पाकिस्तानमधील तरुणीने आक्षेप घेतला आहे. संबरीना खमीसा ही तरुणी म्हणाली, “तुम्ही आमची संस्कृती काय हे ठरवू शकत नाही. पाकिस्तान इस्लामचे अनुकरण करतो. इस्लाम अत्यंत पवित्र आणि शांततावादी धर्म आहे.  मला पाकिस्तानवर अभिमान आहे. तसेच माझे माझ्या संस्कृतीवर प्रेम आहे.” राखी सावंतने देखील या तरुणीला उत्तर दिले आहे. राखी म्हणाली, “हा माझा चित्रपट आहे. तुला तो चांगला वाटत नसेल, तर तू माझ्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन निघून जाऊ शकते.”


राखी सावंत चर्चेत राहण्यासाठी नेहमी काहीना काही वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करते, असा आरोप तिच्यावर अनेकदा झाला आहे. सध्या व्हायरल होत असलेला तिचा हा फोटो देखील या प्रसिद्धीसाठीचा खटाटोप असल्याचे बोलले जात आहे.