मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरात चार मजली इमारत कोसळली आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली जवळपास 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आहे. यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. डोंगरीतील तांडेल स्ट्रीटवरील अब्दुल हमीद दर्ग्याजवळची केसरबाई ही ग्राऊंड फ्लोअर अधिक 4 मजली इमारत कोसळली. कोसळलेली इमारत ही म्हाडाची असल्याची माहिती स्वत: मुंबई महापालिकेने दिली आहे.
सकाळी 11.40 च्या सुमारास डोंगरीतील तांडेल रोडवरील अब्दुल हमिद दर्गा परिसरातील केसरबाई इमारत कोसळली.
यानंतर तातडीने एनडीआरएफच्या टीम, अग्निशामक दलाला पाठण्यात आले.
तातडीने ढिगारा उपसण्याचं काम सुरु
ढिगाऱ्याखाली जवळपास 40 ते 50 जण अडकल्याची भीती
कोसळलेल्या इमारतीचे बचावकार्य सुरु
केसरबाई इमारत कोसळण्यापूर्वीचा फोटो