मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे प्लाझ्मादान अभियान, काय आहेत निकष?

| Updated on: Jul 26, 2020 | 3:37 PM

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सुमारे 50 जणांची प्राथमिक चाचणी शुक्रवारी धारावीत खासदार शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडली

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे प्लाझ्मादान अभियान, काय आहेत निकष?
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त (27 जुलै) शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने मानखुर्दमध्ये ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’ आयोजित करण्यात आले. धारावी परिसरातील सुमारे 500 कोरोनामुक्त रुग्णांनी तयारी दर्शवली आहे. (Plasma Donation Camp by Shivsena in Mankhurd by MP Rahul Shewale)

मानखुर्दमध्ये 27 जुलैपासून सुरु होणाऱ्या या अभियानात सहभागी होण्यासाठी, कोरोनामुक्त दात्यांच्या प्राथमिक चाचणीला शुक्रवारपासून (24 जुलै) सुरुवात करण्यात आली. राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत धारावी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 500 कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी अनुकूलता दर्शवली.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सुमारे 50 जणांची प्राथमिक चाचणी शुक्रवारी धारावीत खासदार शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या दात्यांमध्ये धारावीतील नागरिक, पोलीस अधिकारी, डॉक्टर्स आणि शिवसेना पदाधिकारी यांचा समावेश होता.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’ला धारावीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. मुंबईतील ज्या कोरोनामुक्त व्यक्तींना या अभियानात सामील होण्याची इच्छा असेल त्यांनी जवळच्या शिवसेना शाखेशी किंवा 9321586566 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले.

प्लाझ्मादान कोण करु शकतं?

18 ते 55 वर्षे वयोगटातील ज्या नागरिकांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे आणि ज्यांचा कोरोना बरा होऊन कमीत कमी 28 दिवस झाले आहेत अशा दात्यांच्या रक्ताची प्राथमिक तपासणी केली जाते. यामध्ये दात्याला कोणताही गंभीर आजार नाही ना, तसेच इतर निकषांची खात्री करुनच त्यांना प्लाझ्मा दान करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.