एनडीए सरकार सत्ते आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर सही केली. त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या यंदाचा 17 वा हप्ता कधी देण्यात येणार अशी चर्चा होत आहे. शेतकऱ्यांमध्ये याबाबतची चर्चा पाहायला मिळत आहे. तर या योजनेचा 17 वा हप्ता हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता मिळणार आहे.
या योजनेला लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटींची पूर्तता करावी लागले. तुमच्या ज्या बँक अकाऊंटमध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. ते आकाऊंट आधारकार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. तर दुसरं म्हणजे ई-केवायसी करणं आवश्यक आहे. जर तुम्ही योजनेचे लाभार्थी होणार असाल. तर आज तुमच्या बँकेत जा आणि या दोन अटींची पूर्तता करा.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत सरकारकडून केली जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना दोन हजार रूपये देण्यात येतात. एका वर्षात असे तीन हप्ते दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते दिले गेले आहेत.
2019 सालापर्यंत ज्यांच्या नावावर जमीन आहे, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर जर तुमच्या नावावर जमीन झाली असेल. तर या योजनेचाचा लाभ मिळत नव्हता. पण तो लॉक- इन पिरिअर आता हटवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जेणे करून मधल्या काळात जर एखाद्याने जमीन खरेदी केली असेल किंवा वारसाहक्काने ती जमीन नावावर झाली असेल तर या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल.