मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) मिळाला आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी आज मुंबईतील माटुंग्यात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) हे गैरजर राहिल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे शिवसैनिक आजी चंद्रभागा शिंदे यांच्या भेटीला मात्र सहकुटुंब दिसून आले. त्यामुळे यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असलेल्या मुंबईत आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत, अशी माहिती आधीच मिळाली होती. आणि तेच खरंही ठरलं आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, मंगेशकर कुटुंबीय आणि ह्रदयेश आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमातली मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी चर्चेत राहिली.
या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख उपस्थिती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेष अतिथी म्हणून उषा मंगेशकर यांचे नाव होते. मात्र निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नाही, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर जे शिवसैनिक जमा झाले होते. त्यातील झुकेंगे नहीं म्हणत एका आजींनी पु्ष्पा स्टाईलने उत्तर दिले होते. त्या आजींच्या भेटीला खुद्द मुख्यमंत्री आज पोहोचले त्यामुळे या भेटीचीही जोरदार चर्चा राहिली. मात्र मंगेशकर कुटुंबियांनी काल सायंकाळी मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे जाऊन उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले, असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र तरीही मुख्यमंत्री या कार्यक्रमला अनुपस्थित राहिले.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले. येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तीनही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, लोकप्रतिनिधी आदींनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. मात्र यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते.
Ramdas Athawale: आठवलेंनी दंड थोपाटले, येत्या 10 मे रोजी रिपाइंची राज्यभर निदर्शने