Sanjay Raut : हिटलर इव्हेंट करायचा मोदीही तेच करतात, मोदी हिटलरलाच फॉलो करतात; राऊत म्हणतात, ही टीका नाही; पण…

| Updated on: May 08, 2022 | 3:53 PM

एका निवडणुकीत हिटलरच्या विरोधात प्रचंड प्रचार झाला. त्यावेळी हिटलर म्हणाला, आपण एक पोस्टर लावायचे. त्यात कोणत्याही घोषणा नको. केवळ हिटलरचा फोटो लावला. ते लोकांना आवडले, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला.

Sanjay Raut : हिटलर इव्हेंट करायचा मोदीही तेच करतात, मोदी हिटलरलाच फॉलो करतात; राऊत म्हणतात, ही टीका नाही; पण...
नरेंद्र मोदींवर टीका करताना संजय राऊत
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : जर्मनीचा शासक हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलट (Adolf Hitler) इव्हेंट करायचा. आपल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही इव्हेंट करतात. मोदी हिटलरलाच फॉलो करतात, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. त्यांनी नरेंद्र मोदींसह भाजपाला यावेळी लक्ष्य केले. ते म्हणाले, की हिटलरचे एक आत्मचरित्र आहे, माईन काम्प. यात त्याने सांगितले, की राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रपोगंडा आणि प्रचाराचे महत्त्व फार आहे. तुम्ही कशा प्रकारे प्रचार आणि प्रपोगंडा (Propaganda) करता ते महत्त्वाचे आहे. आज आपल्या देशात तेच सुरू आहे. एका निवडणुकीत हिटलरच्या विरोधात प्रचंड प्रचार झाला. त्यावेळी हिटलर म्हणाला, आपण एक पोस्टर लावायचे. त्यात कोणत्याही घोषणा नको. केवळ हिटलरचा फोटो लावला. ते लोकांना आवडले, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला.

‘त्यांच्या डोक्यात जाईल अशा गोष्टी करायला पाहिजेत’

राऊत पुढे म्हणाले, की हिटलर म्हणतो, सामान्य लोक विचारवंत नसतात. ते वाचत नाहीत. त्यांच्या डोक्यात जाईल अशा गोष्टी करायला पाहिजेत. हिटलर इव्हेंट फार करायचा. जसं मोदी करतात. मोदी हिटलरला फॉलो करतात. सोशल मीडियातील फौजा पाहिल्या तर मोदी पूर्णपणे हिटरला फॉलो करतात. ज्या प्रकारचे हिटलर इव्हेंट करत होता, त्या प्रकारचे इव्हेंट मोदी आणि त्यांचा पक्ष करत आहे. मी त्यांची टीका करत नाही. संपूर्ण जगात हिटलरवर टीका सुरू होती. तेव्हा 1935मध्ये त्यांनी ऑलिम्पिक मिळवून दिले. त्यांनी दाखवून दिले आमचा नेता किती मोठा आहे. हिटलर ऑलम्पिकच्या माध्यमातून जगासमोर आला.

‘ही गोबेल्स निती’

वरुण सरदेसाई तुम्ही आज गालातल्या गालात हसता, पण तुम्हाला याच मार्गाने जावे लागेल. आपल्या देशात विरोधकांना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली. काँग्रेस ते शिवसेनेची बदनामी होत आहे. ही गोबेल्स निती आहे. आपण या नीतीपासून दूर राहतो. पण त्याच माध्यमातून आपली बदनामी झाली आपण फक्त नैतिकता सांभाळत बसलोय, असे म्हणत राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला.