मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आले आहेत. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) उपस्थित राहणार नाहीत, कारण निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी थेट काश्मीरहून मुंबईत दाखल झाल्याच्याही चर्चा आहेत. मोदींच्या राजकीय कामामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी आणि लतादिदी यांचं अत्यंत जीव्हाळ्याचं, अगदी भावा बहिणीचं नात होतं, गेल्या वेळी लता दिदींच्या अंत्यसंस्कारालाही मोदी मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांच्या नावाने मिळणारा हा पहिला पुरस्कार स्वाकरण्यासाठी ते दाखल झाले आहेत.
आज भारत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे
आमच्यासाठी विकासाचा अर्थ आहे, सबका साथ सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास
यासाठी मानवीय मुल्ये गरजेची असतात
आज भारत जगाला दिशा देत आहे
यात भारताच्या संगीताचेही मोठे योगदान
आपण आपल्या इतिहास जिवंत ठेवला पाहिजे
मला विश्वास आहे की संगीत जगताततील लोक भारताला दिशा देतील
मला पुरस्कार दिल्याबद्दल मंगेशकर कुटुबियांचे आभार
समर्थ गुरू रामदास यांचे पदही अमर केले
ये मेरे वतन के लोगो…अशी गाणी अजरामर झाली
आज भारत एक श्रेष्ठ भारताच्या आत्मविश्वासाने पुढे जातोय
त्यांचा स्वरही असेच एकतेचे प्रतीक आहे
प्रत्येक भाषेत त्यांचा स्वर पोहोचला आहे
तुलसी, मीरा, अशा अनेकांचं लिखान गायलं
पूर्ण देशाला एकसुत्राच्या माध्यमातून गीतं मिळाली
पुण्यात त्यांनी त्यांच्या कमाईने रुग्णालय बांदल, हे आजही देशाची सेवा करते
कोरोनात पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयाने चांगले काम केले
ईश्वराचा उच्चारही स्वराविना होत नाही
संगीत मनात खोलवर रुजते
लतादिदी युवा पिढीसाठी एक प्रेरणा आहेत
त्यांनी भारताला स्वातंत्र्याआधीपासून आवाज दिला
मंगेशकर परिवाराचे देशासाठी मोठे योगदान राहिले आहे
आम्हा त्यांचे ऋणी आहोत, राष्ट्रभक्तीची चेतना लतादिलीच्या मनात होती
ब्रिटीश व्हायसरॉयच्या कार्यक्रमात दिनानाथ मंगेशकरांनी सावरकरांचं लिहलेलं गाणं गायलं होतं
इग्रजांना चुनौती देणारे ते गीत होते
मोठी बहीण म्हणून त्यांनी खूप प्रेम दिलं.
यापेक्षा जीवनाचं सार्थक काय असेल.
जेव्हा रक्षा बंधन येईल तेव्हा दीदी नसेल.
मी पुरस्कार घेत नाही. पण बहीणीच्या नावाने पुरस्कार मिळतो त्यामुळे मी आलो.
मंगेशकर कुटुंबावर माझ्यावर हक्क आहे.
आदिनाथचा मेसेज आला. तेव्हा मी किती बीझी आहे हे पाहिलं नाही. म्हटलं होकार द्या.
मला नकार देणं शक्य नाही. मी हा पुरस्कार जनतेला अर्पित करतो.
लतादीदी जनतेच्या दीदी होत्या. त्यामुळे हा पुरस्कारही जनतेला अर्पित करतो.
संगीतासारख्या गहन विषयाचा मी जाणकार नाही. मात्र सांस्कृतिक दृष्टा संगीत ही साधना आहे आणि भावना आहे असं मला वाटतं. अव्यक्तला व्यक्त करते ते शब्द आहे. ऊर्जेत चेतनेचा संचार करते तो नाद आहे. आणि चेतनेत भाव आणि भावना भरते ते संगीत आहे. तुम्ही निस्पृह बसले आहात. पण संगीताचा एक स्वर तुमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढतो. संगीताचा स्वर तुम्हाला वैराग्याचा बोध करू शकतो. संगीताने वीररस भरतो. संगीत मातृत्व आणि ममतेचा अनुबोध करून देतो. संगीत राष्ट्रभक्ती आणि कर्तव्य बोधाच्या शिखरावर पोहोचवतो. संगीताच्या या सामर्थ्याला आपण लता मंगेशकरांच्या रुपामुळे साक्षात पाहिलं आहे. त्यांचं दर्शन करण्याचा अनुभव मिळाला आहे. मंगेशकर कुटुंबाने पिढी दर पिढी या यज्ञात आहुती दिली आहे.
मी विचार करत होतो की दीदीशी माझं नातं कधीपासून किती जुनं आहे. कदाचित चार साडेचार दशक झाले असतील. सुधीर फडके यांनी माझा परिचय करून दिला होता. तेव्हापासून या कुटुंबासोबत अपार स्नेह अगणित घटना माझ्या जीवनाचा हिस्सा बनल्या. माझ्यासाठी लतादीदी सूर साम्राज्ञीसह माझी मोठी बहीण होती. त्याचा मला अभिमान वाटतो.
मंगेशकर कुटुंबियांनी मानले मोदींंचे आभार
मोदी पुरस्कार सोहळ्यात दाखल
मुख्यमंत्री मात्र कार्यक्रमाला गैरहजार
कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंंह कोश्यारीही उपस्थित
अनेकांनी दिला लता मंगशकरांच्या आठवणींना उजाळा
काही वेळातच मिळणार पंतप्रधान मोदींना पहिला पुरस्कार
पुरस्कार सोहळ्याला मख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर
कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव नाही
मुंबई, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तीनही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, लोकप्रतिनिधी आदींनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.