मुंबईः महापुरूषांबाबत वारंवार केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह विधानांविरोधात महाविकास आघाडी व घटक पक्षांकडून नायंगाव येथे काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चा सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मोर्चाचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षासह इतरांना भोईवाडा पोलिसांनी बजावल्या 149 अन्वेय नोटीस देण्यात आल्या आहेत.
या मोर्चामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता व्यक्त करत, पोलिसांनी नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे
या निषेध मोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मराठा क्रांती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यासह इतर संघटनाही सहभागी होणार आहेत.
नायगावच्या कर्डक चौकातून दुपारी 4 वाजता हा मोर्चा सुरू होणार असून सदाकांत ढवन मैदानात समाप्त होणार आहे.
मात्र मोर्चाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच पोलिसांकडून नोटीसा आल्याने सरकार पोलिसांना हाताशी घेऊन मोर्चा दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येऊ लागले आहेत.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना आणि जिल्हाध्यक्षांना नोटीस दिल्या असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून सरकारमधील मंत्री, नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत.
नेत्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर ज्या व्यक्तिने शाई फेकली होती. त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले गेल्याने हे राजकारण आणखी तापले होते.
त्यामुळे आता नायगावमध्ये निघणाऱ्या मोर्चाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्याने आता सरकारवर दडपडशाहीचा आरोप केला जात आहे. त्यामुळे विरोधकांमधूनही आता जोरदार टीका सरकारवर केली जात आहे.